शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वाराला लुटणारे दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST

नंदुरबार : दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या दोघांना एलसीबीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. पुरुषोत्तमनगर-सावखेडा रस्त्यावर ही घटना घडली होती. हर्षल ...

नंदुरबार : दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या दोघांना एलसीबीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. पुरुषोत्तमनगर-सावखेडा रस्त्यावर ही घटना घडली होती.

हर्षल प्रकाश कोळी (रा. गोपाळ नगर, शहादा) व छोटू भुऱ्या ठाकारे (रा. भवानी चौक शहादा) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीस सूत्रांनुसार, लोहित विजय खैरनार व त्यांचे मित्र निरज सुनील पाटील हे लोणखेड्याकडून असलोदकडे मोटारसायकलवरून जात होते. सातपुडा साखर कारखान्याच्या पुढे वळणावर मागून एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलीवर आलेल्या दोघांनी त्यांना अडवून तुमच्यामुळे आमची गाडी स्लिप झाली असे सांगून दोन्ही व्यक्तींना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या खिशातील २३ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हॅन्डसेट जबरीने चोरून पळून गेले. याबाबत लोहित खैरनार यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

भरदिवसा जबरी चोरीची घडलेली घटना गांभीर्याने घेऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्ह्याची पद्धत व घटनास्थळाया अभ्यासावरून आरोपी स्थानिक असल्याचा कयास व्यक्त केला. गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मार्गदर्शन केले.

राजपूत यांनी पथक स्थापन करीत तपास सुरू केला. संशयितांचा कोणताही मागमूस नसताना गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील माहिती काढून व साक्षीदारांकडून प्राप्त माहितीवरून आणि बोलीभाषेवरून संभाव्य ठावठिकाण्यापर्यंत माग काढला. त्यानुसार हर्षल प्रकाश कोळी व छोटू भुऱ्या ठाकारे यांच्या हालचाली संशयित असल्याने दोघांना ते पळून जाण्याच्या बेतात असताना ताब्यात घेतले. चोरलेले २३ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, गुन्हा करण्यासाठी वापरलेली पॅशन प्लस मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला.

ही करवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक विजयसिंह राजपूत, हवालदार दीपक गोरे, प्रमोद सोनवणे, विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार यांच्या पथकाने केली.