दोन गटांत हाणामारी, तीनजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST2021-05-09T04:31:34+5:302021-05-09T04:31:34+5:30

नंदुरबार : किरकोळ कारणातून सुलतानपूर (ता. शहादा) येथे दोन गटांत झालेल्या हाणामारीत तीनजण जखमी झाले. याबाबत म्हसावद पोलीस ठाण्यात ...

Two groups clashed, injuring three | दोन गटांत हाणामारी, तीनजण जखमी

दोन गटांत हाणामारी, तीनजण जखमी

नंदुरबार : किरकोळ कारणातून सुलतानपूर (ता. शहादा) येथे दोन गटांत झालेल्या हाणामारीत तीनजण जखमी झाले. याबाबत म्हसावद पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

जखमींमध्ये मोहन चामाऱ्या आवासे, आशाबाई मोहन आवासे व सोनूसिंग दिवाण आवासे यांचा समावेश आहे. याबाबत पहिली फिर्याद मोहन आवासे यांनी दिली. सोनसिंग दिवाण आवासे हा दारूच्या नशेत शिवीगाळ करीत होता. त्याबाबत मोहन त्याला विचारणा करण्यास गेला असता त्याचा राग येऊन सोनसिंग व इतर तिघांनी त्यास व त्याच्या पत्नीस हाताबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले. शिवाय घराचा दरवाजा तोडून घरात घुसून घराची तोडफोड केली.

याबाबत मोहन आवासे यांनी फिर्याद दिल्याने सोनसिंग आवासे (रा. सुलतानपूर), जाधव देवसिंग ठाकरे (रा. सुलवाडे), राकेश जाधव ठाकरे व प्रवीण विष्णू पवार (रा. मडकाणी, ता. शहादा) यांच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार जितेंद्र पाडवी करीत आहे.

दुसरी फिर्याद सोनसिंग आवासे यांनी दिली. मोहन आवासे हा काही कारण नसताना शिवीगाळ करीत होता. त्याची विचारणा केली असता त्याचा राग येऊन मोहन चामाऱ्या आवासे, नत्या महाराज ऊर्फ नकट्या मक्कन आवासे, राजू भवन दिवान (सर्व रा. सुलतानपूर, ता. शहादा) यांनी लाठ्या, काठ्यांनी मारहाण केली. त्यात सोनसिंग हे जखमी झाले. तिघांविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस कर्मचारी अजित गावित करीत आहेत.

Web Title: Two groups clashed, injuring three