शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हातील एक लाख 92 हजार चिमुकल्यांना आज दोन थेंब जीवनाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ३१ जानेवारीचा रविवार हा पोलिओ रविवार म्हणून पाळण्यात येणार आहे. जिल्हाभरातील शून्य ते पाच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ३१ जानेवारीचा रविवार हा पोलिओ रविवार म्हणून पाळण्यात येणार आहे. जिल्हाभरातील शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एक लाख ९२ हजार बालकांना पोलिओ लस पाजली जाणार आहे. त्यासाठीची तयारी पुर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, दोन आठवड्यापूर्वी ही मोहिम राबविली जाणार होती, परंतु कोरोना लसिकरणामुळे ती पुढे ढकलण्यात आली.रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात या मोहिमेचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत जिल्हाभरातील एक हजार ९९५ केंद्रांवर लसिकरण करण्यात येणार आहे. वीटभट्टी, रेल्वे व बसस्थानक यासह इतर ठिकाणी देखील लसीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक कर्मचारी व वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

अशी असेल पोलिओ लसिकरण मोहीम...ऊसतोड कामगार, विटभट्टी मजूर, बांधकाम व रस्त्यावरील कामे करणारे मजूर यांच्या मुलांच्या नोंदणीकडे विशेष लक्ष देऊन त्यांना पोलिओ लस दिले जाणार आहे.एकुण चार हजार ८०७ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात ग्रामीण भागात ४,४७० तर शहरी भागात ३३७ कर्मचारी यांचा समावेश राहणार आहे. पर्यवेक्षकांमध्ये ग्रामीण भागात ३७६ तर शहरी भागात २९ असे एकुण ४०५ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. सर्व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले गेले आहे.गृहभेटीद्वारे देखील लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी २,९७६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पर्यवेक्षकांची संख्या ३१४ इतकी आहे. तीन दिवस १,४८८ पथके राहणार आहेत.