साडेसात हजार अवकाळी बाधितांना दोन कोटीचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:30 AM2019-12-14T11:30:36+5:302019-12-14T11:30:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवकाळीमुळे बाधित झालेल्या शेतीपिकांची भरपाई म्हणून शासनाने आकस्मिता निधीतून साडेचार हजार कोटी रुपयांना मंजूरी ...

 Two crores of relief in two and a half times | साडेसात हजार अवकाळी बाधितांना दोन कोटीचा दिलासा

साडेसात हजार अवकाळी बाधितांना दोन कोटीचा दिलासा

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अवकाळीमुळे बाधित झालेल्या शेतीपिकांची भरपाई म्हणून शासनाने आकस्मिता निधीतून साडेचार हजार कोटी रुपयांना मंजूरी दिली आहे़ यात नंदुरबार जिल्ह्याच्या वाट्याला २ कोटी ४८ लाख रुपये येणार असून यातून साडेसात हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़
यापूर्वी जिल्हा प्रशासलाने तीन हजार शेतकऱ्यांना १ कोटी १३ लाख रुपयांचे अनुदान वाटप केले होते़ अवकाळी पावसामुळे नंदुरबार तालुक्यात ७८, नवापुर १ हजार ५९३, शहादा २ हजार ६८, तळोदा ८, अक्कलकुव ३ हजार ९६५ तर धडगाव तालुक्यात ३ हजार १७३ अशा एकूण १० हजार ८८५ शेतकºयांचे नुकसान झाले होते़ यासाठी तीन कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे शासनाने घोषित केले होते़ पहिल्या टप्प्यात १ कोटी ३३ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर वाटप करण्यात आले होते़ दुसºया टप्प्यात ७ हजार ७३३ शेतकºयांना २ कोटी रुपयांची भरपाई प्रस्तावित होते़ गेल्या १२ दिवसांपासून या रकमेची प्रतिक्षा करण्यात येत होती़ शुक्रवारी राज्य शासनाने जिल्ह्यासाठी २ कोटी ४८ लाख ४५ हजार रुपये मंजूर केले असले तरी सायंकाळपर्यंत प्रशासनात रक्कम आल्याचा संदेश प्राप्त झालेला नव्हता़ सोमवारी या संबधी कारवाई झाल्यास तात्त्काळ वाटपाला सुरुवात होणार आहे़ तालुकास्तरावर बाधित शेतकºयांच्या याद्या बँक खात्यांच्या माहितीसह तयार असल्याने तातडीने खात्यावर देण्याची कारवाई होणार आहे़


नव्याने मिळणाऱ्या निधीतून नवापुर तालुक्यातील ४३, शहादा १ हजार ५५९, अक्कलकुवा ३ हजार २५४ तर धडगाव तालुक्यातील २९०० शेतकरी असे एकूण ७ हजार ७३३ शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे़ विभागीय आयुक्तांकडून निधी प्रशासनाकडे आल्यानंतर तालुकास्तरावर दिला जाईल़ नंदुरबार आणि तळोदा तालुक्यातील एकाही लाभार्थीला नव्याने मिळालेल्या निधीतून रक्कम मिळणार नसल्याची माहिती आहे़

Web Title:  Two crores of relief in two and a half times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.