किरकोळ कारणातून तिघांनी एकाचे डोके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 12:55 IST2020-03-27T12:55:40+5:302020-03-27T12:55:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : किरकोळ कारणातून तिघांनी एकाचे डोके फोडून हात फॅक्चर केल्याची घटना सोनगीरपाडा, ता.नंदुरबार येथे २४ ...

For trivial reasons the trio struck the head of one | किरकोळ कारणातून तिघांनी एकाचे डोके फोडले

किरकोळ कारणातून तिघांनी एकाचे डोके फोडले

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : किरकोळ कारणातून तिघांनी एकाचे डोके फोडून हात फॅक्चर केल्याची घटना सोनगीरपाडा, ता.नंदुरबार येथे २४ रोजी घडली. तिघांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवन नानू पवार, सावंत नानू पवार, नानू दलपत पवार सर्व रा.सोनगीरपाडा, ता.नंदुरबार असे संशयीतांची नावे आहेत. तर चरण प्रभू पवार से संशयीताचे नाव आहे. चरण पवार यांनी त्यांचे ट्रॅक्टर रात्री गल्लीतून नेत असतांना पवन पवार व इतरांनी अडथळा येणारी खाट काढण्यास नकार दिला. त्यावरून वाद होऊन पवन पवार, सावंत पवार व नानू पवार यांनी चरण पवार यांच्या डोक्यावर व हातावर लोखंडी सळईने वार करून जखमी केले. याबाबत तिघांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक अहिरे करीत आहे.

Web Title: For trivial reasons the trio struck the head of one