शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील भागापूर येथील गोमाई नदीवर पूल बांधलेला नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे ...

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील भागापूर येथील गोमाई नदीवर पूल बांधलेला नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात या नदीत जास्त पाणी राहत असल्याने नागरिकांचे ये-जा करण्यासाठी हाल होतात. काहीवेळा जास्त पाण्यातून नदीतून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन आता तरी येथे पूल बांधावा, अशी मागणी परिसरातील गावांमधील नागरिकांकडून होत आहे.
शहादा तालुक्यातील कवळीथ, गोगापूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून गोमाई नदी वाहते. या नदीवर भागापूर येथे पूल नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात ग्रामस्थांना अनेक समस्या उद्भवतात. पावसाळ्यात या नदीला मोठ्या प्रमाणात पूर असतो. त्यामुळे ग्रामस्थांचा ये-जा करण्याचा एकमेव मुख्य रस्ता असल्यामुळे गावाचा इतर गावांशी संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यामध्ये जर शाळा सुरू राहिल्या तर विद्यार्थ्यांनाही शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे त्यांना ब्राह्मणपुरीपर्यंत पायी यावे लागते. तसेच पूरपरिस्थितीत अचानक प्रकृती बिघडल्यास एखादा रुग्ण दगावण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या नदीवर मोठा पूल बांधण्यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायतीने संबंधित अधिकाºयाकडे मागणी केली होती. ही मागणी मंजूरदेखील करण्यात आली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नदीवर पूल बांधण्याचा प्रस्ताव तयार करून पाच कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे या कामाचे टेंडर निघाले नसल्याचे बोलले जात आहे.

गोमाई नदीला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर असतो. ये-जा करण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने पावसाळ्यात अनेक अडचणी निर्माण होतात. पूल बांधण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने याआधी संबंधितांना निवेदने दिली आहेत. परंतु अद्यापही पुलाचे काम सुरू झालेले नाही. संबंधित विभागाने लवकरात लवकर पुलाचे काम सुरू करुन ग्रामस्थांचे होणारे हाल थांबवावेत.
-नीलेश पाटील,
उपसरपंच, भागापूर, ता.शहादा.