रस्त्यावरील चिखलामुळे वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:32 IST2021-07-28T04:32:02+5:302021-07-28T04:32:02+5:30

कोळदा ते सेंधवा या महामार्गाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. प्रकाशा ते डामरखेडा गावादरम्यान रस्त्याचे काम अपूर्ण आहे. ...

Traffic jam due to mud on the road | रस्त्यावरील चिखलामुळे वाहतूक ठप्प

रस्त्यावरील चिखलामुळे वाहतूक ठप्प

कोळदा ते सेंधवा या महामार्गाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. प्रकाशा ते डामरखेडा गावादरम्यान रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्याठिकाणी मातीचा भराव केला असल्याने पाऊस आल्यावर चिखल होतो. या चिखलात अजवड वाहने रुतत असल्याने दोन्ही बाजूने वाहतूक तासन्‌तास ठप्प होते. मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर झालेल्या चिखलात सकाळी साडेनऊ वाजता एक वाहन मध्येच अडकले. या अवजड वाहनामुळे इतर वाहनांना निघण्यास रस्ता नसल्याने दुतर्फा वाहनांची रांगच रांग लागली होती. काही वाहनधारकांनी डामरखेडामार्गे धुरखेडा रस्त्याकडून वाहने नेली. प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी विकास शिरसाठ, अजिद नागलोद, प्रकाश अहिरे यांनी एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करून दीड-दोन तासात वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, या रस्त्याच्या काम करणाऱ्या ठेकेदाराच्या चुकीमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वीच काम व्हायला हवे होते. मात्र, ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे याठिकाणी पावसाळ्यात ही परिस्थिती येऊन ठेपली आहे.

Web Title: Traffic jam due to mud on the road