शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

संथगतीच्या कामाने वाहतुकीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : विसरवाडी ते खेतिया रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून प्रगतीपथावर आहे. याचा पहिला टप्पा असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : विसरवाडी ते खेतिया रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून प्रगतीपथावर आहे. याचा पहिला टप्पा असलेल्या कोळदा ते खेतिया रस्त्याचे काही ठिकाणी काम संथगतीने होत असल्याने रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. परिणामी हा रस्ता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे.गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत या रस्त्यावर अनेक मोठे अपघात झाले असून, यात नाहक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा अनेक वाहनचालक मनमानी कारभार करत असून, रस्त्याच्या कडेला आपली वाहने उभी करत असल्याने अपघातांची मालिका सुरूच असल्यामुळे सध्या तरी हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरू पाहात आहे.कोळदा ते खेतिया पावेतोच्या रस्त्याचे काम गत वर्षभरापासून सुरू आहे. सद्या शहादा शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असून, या रस्त्याच्या दोन्हीबाजुला गटारी तयार केल्या जात आहेत. या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक येणार असल्याने शहादा ते प्रकाशा रस्त्यावरील १३२ के.व्ही. सब स्टेशनपासून ते वनविभाग चौफुलीपावेतोच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. दुभाजकाचे काम सध्या सुरू असून रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटारी तयार करण्यात आल्या आहेत. या गटारीलगत रिकामी चारचाकी वाहने उभी केली जातात. विशेषत : मालट्रक उभ्या राहत असल्याने रस्त्याने जाणाºया दुचाकी, चारचाकी वाहनांना रस्ता ओलांडून ये-जा करतांना समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने आतापावेतो किरकोळ अपघात होत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजुस ही रिकामी वाहने उभी राहत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नुकतीच याच रस्त्यावर एक घटना घडली. शिरूड चौफूलीच्यापुढे एक ट्रक रस्त्यालगत उभा होता. या ट्रकवर ताडपत्री बांधण्याचे काम सुरू असतांना जोरदार हवेने ताडपत्री उडून रस्त्याने जाणाºया दुचाकी स्वारावर ती पडली. परिणामी अपघात होवून दुचाकीवरील दोघांना जायबंदी व्हावे लागले. त्यांचा दोष नसतांना अपघात झाल्याने रस्त्याने जाणाºया वाहनधारकांनी रोष व्यक्त केला. शहादा शहरातून जाणाºया या रस्त्यालगत उभ्या राहणाºया वाहनधारकंंना संबंधीतांनी सूचना देवून भविष्यातील दुर्घटना टाळण्याची अपेक्षा सुज्ञ वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत सोशल मिडीयातूनही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.दरम्यान, शहादा शहरातून जाणाºया महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या व्यवसायिकांनी थेट गटारीसह रस्त्यावरच व्यवसायाला प्रारंभ केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन तसेच संबंधीतांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात या रस्त्यावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज्य महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून, शहादा शहरालगतच्या रस्त्याच्या दोन्ही किनारी वाहने लावण्यात आल्याने किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी रिकामी वाहने रस्त्यालगत उभी राहू नयेत यासाठी संबंधीतांना सूचना करणे गरजेचे झाले आहे.