अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 11:52 IST2020-04-05T11:52:22+5:302020-04-05T11:52:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अल्पवयीन मुलीशी अनैतिक संबध ठेवून तिला गर्भवती करीत माता बनविल्याप्रकरणी आंबापाणी, ता.शहादा येथील एकाविरुद्ध ...

Torture on a minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अल्पवयीन मुलीशी अनैतिक संबध ठेवून तिला गर्भवती करीत माता बनविल्याप्रकरणी आंबापाणी, ता.शहादा येथील एकाविरुद्ध बलात्कार व पोस्कोप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मदन कृष्णा तडवी, रा.आंबापाणी ता.शहादा असे संशयीताचे नाव आहे. आंबापाणी येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून मदन कृष्णा तडवी याने तिच्याशी शाररिक संबध ठेवले. त्यातून ती गर्भवती देखील राहिली. दोन मुलींना देखील तीने जन्म दिला. ही बाब कुणाला सांगितली तर ठार मारण्याची धमकी देखील मदन तडवी याने दिली.
आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर मुलीने म्हसावद पोलीस ठाणे गाठून मदन कृष्णा तडवी याच्याविरुद्ध फिर्याद दिली. मुलीच्या फिर्यादीवरून बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार देविदास सोनवणे करीत आहे.

Web Title: Torture on a minor girl