शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

माहेरुन पाच लाख आणावेत म्हणून छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील माळीवाडा येथील माहेर तर एरंडोल येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पाच लाख रुपयांसाठी छळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील माळीवाडा येथील माहेर तर एरंडोल येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पाच लाख रुपयांसाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला़ विवाहितेने याबाबत फिर्याद दिली आह़े फेब्रुवारी 2017 ते ऑक्टोबर 2018 दरम्यान छळ करण्यात आला होता़ माधुरी महेंद्र जगताप यांचा विवाह महेंद्र मधुकर जगताप रा़ एरंडोल यांच्यासोबत झाला होता़ दरम्यान माधुरी यांनी नंदुरबार येथील माहेरुन 5 लाख रुपये आणावेत यासाठी छळ करण्यात येत होता़ वेळावेळी मारहाण करुन शिवीगाळ करत जिवे  ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती़ दरम्यान त्यांच्या अंगावरचे सोन्याचे दागिने सासरच्यांनी काढून घेतले होत़े याप्रकरणी पती महेंद्र, सासू लताबाई जगताप, सुभाष रामदास जगताप, लिलाबाई सुभाष जगताप, राहुल सुभाष जगता सर्व रा़ एरंडोल व संजय आनंदा माळी व रुपाली संजय माळी यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सामुद्रे करत आहेत़

खांडबारा येथील विवाहितेचा छळ 

नवापुर तालुक्यातील खांडबारा येथील सासर तर सारंगखेडा ता़ शहादा येथील माहेर असलेल्या शितल कमलेश पानपाटील यांचा सासरच्यांनी छळ केला़ पती कमलेश आनंदा पानपाटील, सासू वत्सलाबाई आनंदा पानपाटील दोघे रा़ खांडबारा तसेच कांतीलाल आनंद पानपाटील, रेखा कांतीलाल पानपाटील, सुनिता राजू वेंदे सर्व रा़ मढी ता़ महुआ सुरत यांनीमे 2017 ते जुलै 2019  या काळात विवाहिता शितल यांना शारिरिक व मानसिक त्रास दिला होता़ स्वयंपाक येत नसल्याचे तसेच मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरुन पतीसह  सासरच्यांकडून वेळोवेळी मारहाण करण्यात आली होती़  याप्रकरणी बुधवारी विवाहिता शितल पानपाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती कमलेश पानपाटील याच्यासह सर्व चार संशयितांविरोधात सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत़