शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

तोरणमाळच्या पर्यटन विकासाला चालणा देणार : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST

मोलगी आणि धडगाव परिसरातील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाच्या पाहणीसाठी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंदुरबार जिल्ह्यात आले ...

मोलगी आणि धडगाव परिसरातील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाच्या पाहणीसाठी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंदुरबार जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांच्या सोबत आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री ॲड. के. सी.पाडवी, कृषिमंत्री दादा भुसे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, आमदार मंजुळा गावीत, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.

रुग्णालयातील पाहणीनंतर धडगाव ग्रामीण रुग्णालयात झालेल्या कोरोना संदर्भातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले की, शहरी भागात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असतात. परंतु ग्रामीण आणि विशेषत: दुर्गम भागातील नागरिकांना अशा सुविधा मिळणे आवश्यक आहे. कोविडचा धोका पुन्हा वाढला आहे. मात्र, यावेळी एक ढाल म्हणून लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. लसीकरणाबाबत जनतेच्या मनातील शंका दूर करून लसीकरणाचा वेग वाढवावा. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वत्र पालन होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्ह्याने जनजागृतीचे चांगले उपक्रम राबविले असून, त्यात यापुढेही सातत्य ठेवण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

तोरणमाळ पर्यटन विकास आराखडा तयार करा

तोरणमाळ पर्यटन विकासाचा सूक्ष्म आराखडा तयार करावा, पर्यटन विकासाच्या माध्यमातून येथील रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. ते म्हणाले की, विकास आराखडा तयार करताना प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा. परिसरात पळसाची झाडे रांगेत लावण्यासारख्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या संकल्पना राबवाव्या. लवकरच पर्यटनमंत्र्यांच्या समवेत याबाबत बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री पाडवी म्हणाले की, जिल्ह्यात फळबाग लागवड कार्यक्रम राबविल्यास २०० डोंगर हिरवे होतील. त्यासाठी ग्रामपंचायतींचा सहभाग घेता येईल. जिल्ह्यातील आश्रमशाळांमधून सॅटेलाईट एज्युकेशन राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात मनरेगाच्या माध्यमातून यावर्षी विक्रमी फळबाग लागवड झाल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागातील कोरोना परिस्थितीची, तर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती दिली.

धडगाव येथे लसीकरणाचा आढावा

मुख्यमंत्र्यांनी धडगाव ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्राला भेट देऊन कोरोना लसीकरणाची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांना मास्क घालून शारीरिक अंतराचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच परिचारिकांच्या कामाचे कौतुकही केले.

फळरोप वाटिकेची पाहणी

मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठकीनंतर कृषी विभागाच्या फळरोपवाटिकेची पाहणी केली. कृषिमंत्री दादा भुसे यांनी पारंपरिक पद्धतीने धनुष्यबाण देऊन त्यांचे स्वागत केले. ठाकरे यांनी रोपवाटिकेबाबत समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी फळबाग लागवड महत्त्वाची ठरेल. त्यादृष्टीने जिल्ह्यासाठी आणखी फळबाग रोपवाटिका तयार करण्यास शासन सहकार्य करेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. सीडबॉल तयार करून ते अधिक पाऊस असलेल्या भागातील उजाड डोंगरावर टाकण्याचा कार्यक्रम राबवावा, अशी सूचना त्यांनी केली.

ॲड. के. सी. पाडवी यांनी सातपुड्यातील डाब येथील स्ट्रॉबेरी मुख्यमंत्र्यांना भेट दिली. प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.