शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

तिलाली गाव एक महिन्यापासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 12:10 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  तालुक्यातील तिलाली गावात गेल्या एक महिन्यापासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना अंधारातच राहावे लागत आहे. ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  तालुक्यातील तिलाली गावात गेल्या एक महिन्यापासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना अंधारातच राहावे लागत आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडेही यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे.  गेल्या एक महिन्यापासून तिलाली गावात अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे विद्यार्थी, सामान्य नागरिक व व्यावसायिकांचे नुकसान होत असून, वीजेअभावी दैनंदिन कामातील गती मंदावली आहे. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून या भागातील वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.१५ दिवसापासून वीजपुरवठा खंडित राहिल्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे ॲानलाईन तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची त्यांनी दखल घेत दिलगीरी व्यक्त केली व लवकरात लवकर समस्या सोडवू असे सांगण्यात आले. ऐन सनासुदीच्या काळात वीजप्रवाह खंडित झाल्यामुळे दिवाळी अंधारात गेल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. एका महिना होवूनही वीजपुरवठा पूर्ववत झाला नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहे.दरम्यान, इयत्ता पहिली ते महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वीजेअभावी ऑनलाईन तासिकांपासून मुकावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण कसे द्यावे असा प्रश्न पालक व शिक्षकां पुढे निर्माण झाला आहे. वारंवार वीजप्रवाह खंडित होत असल्यामुळे मोबाईल नेटवर्क सेवाही बंद पडते. त्यामुळे ॲानलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यापुुढे समस्या निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे अत्यावश्यक संपर्क करण्यासाठी डोंगरावर जावे लागते.गावातील वीज प्रवाह करणारे पोल व तार जीर्ण झाल्यामुळे वारंवार शॉर्ट सर्किट होण्याचे प्रमाण वाढले होते. अचानक शॉर्ट सर्किट होत असल्यामुळे अपघात होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील जीर्ण विद्युत तारा व पोल नव्याने बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रामध्ये वांरवार बिघाड होत असल्यामुळे विद्युत प्रवाहही खंडित होत आहे. गावातील जीर्ण तारांच्या ठिकाणी केबल टाकणे गरजेचे आहे. यामुळे वीज चोरीला आळा बसून, वीज प्रवाह सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून त्वरित उपयायोजना कराव्यात, अशी अपेक्षा आहे.