नंदुरबार जिल्ह्यात जन्मली तीन पायांची कोंबडी

By Admin | Updated: April 22, 2017 13:15 IST2017-04-22T13:15:19+5:302017-04-22T13:15:19+5:30

प्रतापपूर, ता.तळोदा येथील एका कोंबडीच्या पिल्लाला चक्क तीन पाय आहेत.

Three-legged poultry in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यात जन्मली तीन पायांची कोंबडी

नंदुरबार जिल्ह्यात जन्मली तीन पायांची कोंबडी

कोठार, जि. नंदुरबार, दि. 22 -  दोन- तीन डोके असणारी जुळी मुले, प्राणी, दोन व्यक्ती असून हात-पाय एकत्र चिकटलेली किंवा शरीराचे अवयव एकत्रित असणा:या याबाबत ज्ञात आहे. परंतु प्रतापपूर, ता.तळोदा येथील एका कोंबडीच्या पिल्लाला चक्क तीन पाय आहेत.
प्रतापपूर येथील राणा प्रताप माध्यमिक विद्यालयातील कर्मचारी श्यामप्रसाद आगळे हे शेतीबरोबर मर्यादीत स्वरुपात कुक्कुटपालनदेखील करतात.   अंडी उबवायला ठेवली असताना त्यातून एक पिलू हे चक्क तीन पाय असणारे जन्माला आले आहे. सुरुवातीचे आठ दिवस हे पिलू लहान असल्याने त्याला तीन पाय आहेत हे कोणाच्या लक्षात आले नाही. मात्र आठ-दहा दिवसानंतर ते पिलू तीन पायांचे असल्याचे आगळे कुटुंबीयांच्या लक्षात आले. तीन पायांचे पिलू असल्याने त्याची सर्वाना उत्सुकता वाटली.  या पिल्लाला चालताना अडचण होत असल्याचे दिसून आले. अंधश्रद्धेचा पगडा असणारे अनेकजण याला दैवी चमत्कार असल्याचे समजत आहेत तर अनेक लहान मुलांना हे पिलू दाखवून त्यांची करमणूक होत आहे. सध्या हे तीन पायाचे कोंबडीचे पिलू गावात व परिसरात आश्चर्याचा व चर्चेचा विषय ठरला आहे.
‘कंजनाईटेल अबनॉर्मलिटी’ या प्रकारामुळे असे तीन पायाचे किंवा तीन, सहा डोक्याचे प्राणी व पक्षी जन्मास येऊ शकतात. गर्भातच तशी त्यांची गुणसूत्रे जुळतात. काही प्राणी-पक्षी त्या स्थितीत जुळवून घेतात तर काहींना ते शक्य नसते. त्यांची दगावण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत शक्य असल्यास शस्त्रक्रिया करून जास्तीचे अवयव काढून टाकले जातात.
-डॉ.किशोर सामुद्रे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, तळोदा

Web Title: Three-legged poultry in Nandurbar district