शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेडा जवळील अपघातात तीन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा-सारंगखेडा रस्त्यावर सप्तशृंगी पेट्राेल पंपाजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन तीन जण ठार झाल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सारंगखेडा : शहादा-सारंगखेडा रस्त्यावर सप्तशृंगी पेट्राेल पंपाजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन तीन जण ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेत एक महिला जखमी झाली आहे. मृतांमध्ये मामा-भाच्याचा समावेश आहे.

याबाबत वृत्त असे की, अक्षय रामा पाडवी हे आपल्या मोटारसायकल क्रमांक एमएच १८- एयू ६९०६ ने तीन सीट बसवून शहाद्याकडून सारंगखेडाकडे येत होते. त्याला समोरून येणाऱ्या एमएच १८- बीएस ७५१५ या मोटारसायकलने धडक दिल्याने, अक्षय रामा पाडवी (३३) रा.अनरद, ता.शहादा व त्याचे मामा मोतीलाल मंगा भिल (३७) रा.होळ, ता.नंदुरबार हे खाली पडले. त्यांना जबर मार लागल्याने दोन्ही जण जागीच ठार झाले. या मोटारसायकलवर असलेल्या सताबाई मोतीलाल भिल रा.होळ, ता.नंदुरबार या जखमी झाल्या, तर धडक देणाऱ्या मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी म्हसावद ग्रामीण रुग्णालयात हलविले असता, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. संबंधित व्यक्ती हा मुकटी, ता.धुळे येथील रहिवासी असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात बापू धर्मा पाडवी रा.अनरद यांच्या फिर्यादीवरून मुकटी, ता.धुळे येथील अज्ञात मृत व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे व सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी भेट देऊन चौकशी केली.