दारू पिऊन वाहन चालविल्याने जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 12:19 IST2020-12-21T12:19:41+5:302020-12-21T12:19:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  नवापूर व अक्कलकुवा येथे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तीन जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात ...

Three cases have been registered in the district for driving under the influence of alcohol | दारू पिऊन वाहन चालविल्याने जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल

दारू पिऊन वाहन चालविल्याने जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  नवापूर व अक्कलकुवा येथे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तीन जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्रांनुसार, नवापूर येथे महामार्गावर दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या दोन जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. वळण रस्त्यावरील पिंपळनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर भारतभाई समजूभाई मोनपारा, रा.जुनागड हे त्यांच्या ताब्यातील कार दारू पिऊन चालवत होते. पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. दुसरी कारवाई जुना आरटीओ नाका परिसरात घडली. कमलेश धनराज बागुल रा.वासखेडी, ता.साक्री यांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकी दारू पिऊन चालविली. पोलिसांनी तपासणी केली असता त्यांच्यावर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत  जमदार जगदीश सोनवणे व विक्की वाघ यांनी फिर्याद दिली. तिसरी कारवाई अक्कलकुवा येथे करण्यात आली. जगदीश चंद्रसिंग वळवी, रा.घंटाणी यांनी दुचाकी दारू पिऊन चालविली. वैद्यकीय तपासणी केली असता पोलीस कर्मचारी धनंजय धनगर यांनी फिर्याद दिली असता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Three cases have been registered in the district for driving under the influence of alcohol