शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तीन विवाहितांचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माहेरुन पैसे आणावेत तसेच इतर कारणांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी विवाहितांच्या छळप्रकरणी पोलीसात गुन्हे दाखल करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माहेरुन पैसे आणावेत तसेच इतर कारणांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी विवाहितांच्या छळप्रकरणी पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ विवाहितांच्या फिर्यादीवरुन ही कारवाई करण्यात आली़उपनगर पोलीस ठाणेखेडदिगर ता़ शहादा येथील सासर तर शहरातील इंदिरानगर येथील माहेर असलेल्या हिरल हर्षल पटेल यांचा सासरच्यांनी दहा लाख रुपयांसाठी छळ केला़ नोव्हेंबर २०१६ ते आॅगस्ट २०१९ पर्यंत हा प्रकार सुरु होता़ मेडिकल दुकान टाकण्यासाठी माहेरुन पैसे आणावेत अशी सासरच्यांची मागणी होती़ याबाबत हिरल पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती हर्षल रोहिदास पटेल, सासरे रोहिदास लक्ष्मण पटेल, सासू रंजनाबाई रा़ खेडदिगर, हर्षा नारायण पाटील व प्रज्ञा प्रशांत पाटील दोन्ही रा़ सुलवाडे यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़शहादा पोलीस ठाणेअसलोद येथील माहेर तर यावल येथील सासर असलेल्या पूनम विरेंद्रसिंग सिसोदिया यांचा हुंड्यासाठी सासरच्यांनी छळ केला़ मार्च ते सप्टेंबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला़ याबाबत पूनम सिसोदिया यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पती विरेंद्रसिंग तेजपालसिंग सिसोदिया, सासरे तेजपालसिंग सिसोदिया, सासू मिनाबाई तिघे रा़ यावल व राजेंद्रसिंग जगन्नाथसिंग जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे करत आहेत़उपनगर पोलीस ठाणेशहरातील माहेर असलेल्या भारती हेमकांत बच्छाव यांचा सासरच्यांकडून तीन लाख रुपयांसाठी छळ करण्यात आला़ पती हेमकांत व सासू कल्पनाबाई चंद्रकांत बच्छाव रा़ साक्री यांनी चारित्र्यावर संशय घेत मानसिक व शारिरिक त्रास दिला होता़ याप्रकरणी विवाहितेने महिला दक्षता समितीकडे अर्ज दिला होता़ याबाबत भारती बच्छाव यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पती हेमकांत व सासू कल्पनाबाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे़