दुसऱ्या टप्प्यासाठी साडेतीनशे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 09:08 PM2020-10-21T21:08:47+5:302020-10-21T21:08:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शासनाने कोरोनाबाबत जनजागृती आणि सर्वेक्षण करण्यासाठी सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत दुसऱ्या ...

Three and a half hundred squads for the second phase | दुसऱ्या टप्प्यासाठी साडेतीनशे पथक

दुसऱ्या टप्प्यासाठी साडेतीनशे पथक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शासनाने कोरोनाबाबत जनजागृती आणि सर्वेक्षण करण्यासाठी सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली असून त्यात ३५० पथकांचा सहभाग आहे. दुसऱ्या टप्प्याच्या सर्वेक्षणात जे कुटुंब बाहेरगावी गेले होते त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. 
पहिल्या टप्प्याप्रमाणे प्रत्येक घरी जावून ऑक्सिजन पातळी व थर्मल गनद्वारे ताप मोजण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या सर्वेक्षणासाठी अक्कलकुवा तालुक्यात ५०, धडगाव ४७, नंदुरबार ८०, नवापूर ६१, शहादा ९० आणि तळोदा तालुक्यात ३१ पथक नेमण्यात आले आहेत. पथकात आशा सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अतिजोखिमीच्या व्यक्तींना दुसऱ्या टप्प्यात घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शनही करणार आहे. एखाद्या व्यक्तीत कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ स्वॅब चाचणी मोबाईल टीमद्वारे करून घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत तीन लाख ७४ हजार १८८ घरापैकी एकूण एक लाख नऊ हजार २०५ अधिक घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. नंदुरबार तालुक्यातील एक लाख ११ हजार ९९७, अक्कलकुवा ३२ हजार ३२९, धडगाव ४४ हजार ९४७, नवापूर एक लाख ३४ हजार ४३५, शहादा एक लाख २२ हजार ३३५ आणि तळोदा तालुक्यातील ३६ हजार ७२५ असे एकूण चार लाख ८२ हजार ७६८ नागरीकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात नागिरकांनी सहकार्य केल्याने ९१ टक्के नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. त्यापैकी ८४ टक्के नागरिकांच्या ऑनलाईन नोंदीदेखील पूर्ण करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आरोग्य पथकाला तपासणीसाठी सहकार्य करुन प्रत्येकानी तपासणी करुन घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Three and a half hundred squads for the second phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.