खांडबारा येथे ६३ हजारांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 12:51 IST2020-01-16T12:51:12+5:302020-01-16T12:51:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मागील दरवाजाने घरात प्रवेश करून घरातील ६३ हजार रुपये किंमतीचे दागीने चोरट्यांनी लंपास केल्याची ...

Thousands of houses were destroyed in Khandbara | खांडबारा येथे ६३ हजारांची घरफोडी

खांडबारा येथे ६३ हजारांची घरफोडी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मागील दरवाजाने घरात प्रवेश करून घरातील ६३ हजार रुपये किंमतीचे दागीने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना खांडबारा, ता.नवापूर येथील रेल्वे कॉलनीत १४ रोजी घडली. विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खांडबारा येथील रेल्वे कॉलनीत राहणारे विलास प्रताप वानखेडे यांच्या घराच्या मागील भिंतीवरून चोरट्यांनी आत प्रवेश करून मागील दरवाजाद्वारे घरात घुसला. घरातील कपाटातून चोरट्यांनी ६३ हजार रुपये किंमतीचे दागीने चोरून नेले. वानखेडे यांनी दागीन्यांचा बॉक्स कुठे ठेवला गेला म्हणून शोधाशोध केली. चोरी झाल्याचे नंतर त्यांच्या लक्षात आले.
याबाबत विलास वानखेडे यांनी फिर्याद दिल्याने विसरवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार चौरे करीत आहे.

Web Title: Thousands of houses were destroyed in Khandbara