शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकांकडून फवारणीचा तिसरा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका हद्दीत अग्निशमन दलांची मदत घेत सोडियम हायड्रोक्लोराईडची फवारणी करण्याचे आदेश शासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका हद्दीत अग्निशमन दलांची मदत घेत सोडियम हायड्रोक्लोराईडची फवारणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत़ हे आदेश येण्यापूर्वी जिल्ह्यातील चारही पालिका आणि एक नगरपंचायत यांच्याकडून फवारणी सुरु असून आतापर्यंत या सर्वांनी मिळून तीन हजार लीटर द्रव्य फवारुन निर्जंतुकीकरण करुन घेतले आहे़नंदुरबार नगरपालिकेकडून शहरातील सर्व १९ प्रभागांमध्ये गेल्या २२ तारखेपासून सातत्याने फवारणी व कोरोनाबाबत जागृती सुरु आहे़ प्रारंभी पालिकेने नुवान हे प्रभावी औषध वापरुन फवारणी केली होती़ साधारण २०० लीटर फवारणी करण्यात आल्यानंतर पालिका प्रशासनाने शासनाच्या आदेशाने आतापर्यंत ६०० लीटर सोडियम हायड्रोक्लाराईडची फवारणी करुन निर्जंतुकीकरण केले आहे़ यासाठी १० ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली होती़ अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी सहकार्य केले होते़ शहरात पहिल्या दोन टप्प्यात फवारणी पूर्ण करण्यात आली असून तिसºया टप्प्यातील फवारणीला सुरुवात होत आहे़शहादा पालिकेंतर्गत शहरातील १३ प्रभाग आणि शहरालगतच्या ग्रामपंचायत हद्दीतील वसाहतींमध्ये तब्बल अडीच हजार लीटर सोडियम हायड्रोक्लोराईड वापरण्यात आले आहे़ हे द्रव्य फवारणीसाठी शासनाचा आदेश येण्यापूर्वी शहादा पालिकेने अग्निशमन दलाचे १ वाहन स्वतंत्रपणे केवळ फवारणीसाठी तयार करुन घेत कामकाज सुरु केले होते़ सोबत वेळोवेळी नागरिकांकडून देण्यात आलेल्या ट्रॅक्टरच्या माध्यमातूनही शहरासह लगतच्या परिसरात फवारणी पूर्ण करण्यात आली आहे़ पालिकेचे तिसºया टप्प्याची फवारणी पूर्ण होत आली आहे़ तळोदा नगरपालिकेने शहरातील सात प्रभागांमध्ये ३०० लीटर सोडियम हायड्रोक्लोराईडची फवारणी करुन घेतली आहे़ पालिकेचा तिसरा टप्पा सुरु आहे़नवापुर पालिकेने सर्व १० प्रभागांमध्ये पहिल्या फेरीत पालिका आरोग्य विभाग आणि अग्निशमन दल यांच्या मदतीने ११० लीटर नुवान हे द्रव्य वापरुन निर्जंतुकीकरण केले गेले होते़ दुसºया फेरीत शासनाच्या आदेशानुसार आतापर्यंत चार प्रभागात ४० लीटर सोडियम हायड्रोक्लोराईड फवारले गेले आहे़ पालिका कर्मचारी शहरातील रहिवासी वस्त्या, शेल्टर होम, आयसोलेशन वॉर्ड यासह बँका आणि रंगावली परिसरातील भाजीबाजारातही नियमित फवारणी करत आहेत़ धडगाव नगरपंचायतीेने सर्व सहा प्रभागात सोडियम क्लोराईडची फवारणी केली आहे़निर्जंतुकीकरणासाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या सोडियम हायड्रोक्लोराईडमुळे कामानिमित्त बाहेर येणाऱ्यांना बाहेरील वस्तूतून संसर्गाचा धोका कमी होतो आहे़ शहादा पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात अडीच हजार लीटर फवारणी करताना कर्मचाºयांनी गर्दीच्या ठिकाणांना प्राधान्य दिले आहे़ यात बँका, भाजीपाला बाजार यांचा समावेश आहे़ नंदुरबार शहरातही जागोजागी निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला जात आहे़