शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
3
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
4
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
5
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
6
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
7
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
8
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
9
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
10
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
11
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
12
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
13
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
14
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
15
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
16
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
17
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
18
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
19
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
20
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांनी’ फुलविले ५०० कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन दिवसांवर ईद येऊन ठेपली असून ईदचा चंद्र पाहण्यासाठी मुस्लीम समाजातील सर्वांनाच उत्सुकता लागून ...


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दोन दिवसांवर ईद येऊन ठेपली असून ईदचा चंद्र पाहण्यासाठी मुस्लीम समाजातील सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. यंदा कोरोनाने अनेकांच्या चेहऱ्यावरील हास्यच हिणवले असल्याने हे हास्य फुलविण्यासाठी आॅल इंडिया मेमन जमात फेडरेशनतर्फे ईदच्या खरेदीतील रक्कम वाचवून जिल्ह्यातील सुमारे ५०० कुटुंबांच्या चेहºयावर हास्य फुलवले आहे.
ईद हा मुस्लीम समाजातील वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण. वर्षातून एकदा येणाºया या सणानिमित्त संपूर्ण रमजान महिन्यात जवळपास सर्वच मुस्लीम बांधव उपवास करतात. त्यानिमित्ताने इफ्तार पार्टी होतात. नवीन कपडे व इतर साहित्याची खरेदी केली जाते. यावर्षी मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने रमजान महिन्यातील उत्साह काहीसा हरवला आहे. संपूर्ण जगातच मानव जातीवरील हे संकट असल्याने हे संकट दूर व्हावे यासाठी अनेक ठिकाणी प्रार्थना केली जात आहे.
आॅल इंडिया मेमन जमात फेडरेशनच्या नंदुरबार जिल्हा संघटनेतर्फे त्यानिमित्ताने एक वेगळा उपक्रम राबविण्यात आला. मेमन जमातीचे जिल्ह्यात सुमारे ७५० कुटुंब आहेत. त्यांनी यावर्षी ईदच्या खरेदीची रक्कम व इफ्तार पार्टीवरील रक्कम निराधार व गरीब कुटुंबांच्या मदतीसाठी एकत्र करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार समाजातील बहुतांश कुटुंबांनी निधी दिला. या निधीतून जिल्ह्यातील जवळपास ५०० पेक्षा अधिक कुटुंबांना संसारोपयोगी साहित्य, जीवनावश्यक वस्तू वाटप करून गरीब कुटुंबांच्या चेहºयावर हास्य फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर स्थलांतरित मजुरांसाठी फुड पॉकेटसह ज्या मजुरांच्या पायात चप्पल नसेल अशा मजुरांना चप्पल वाटप करण्यात आले. याशिवाय मजुरांना आवश्यक त्या वस्तूही देण्यात आल्या. एकूणच मेमन जमातीने या उपक्रमातून राष्टÑीय एकात्मता जोपासण्याचा प्रयत्न केला.


यावर्षी कोरोनाचे संकट मानव जातीवर आले आहे. अशा स्थितीत ईदच्या वैयक्तिक कुटुंबासाठी आनंद घेण्यापेक्षा तो समाजात वाटावा या हेतूने मेमन जमात फेडरेशनने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. त्याला आॅल इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष इकबाल आॅफिसर व युवा अध्यक्ष इम्रान फ्रुटवाला यांनाही तो उपक्रम चांगला वाटल्याने त्यांनी त्याचे स्वागत करून देशातील विविध भागातही तो राबविण्याचे आवाहन केले होते. यामुळे यंदाची ईद अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निश्चितच आनंद राहणार आहे.
-शब्बीर मेमन, अध्यक्ष, मेमन जमात फेडरेशन, उत्तर महाराष्टÑ.