शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

औषधी वनस्पतींच्या किमतीत झाली मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रतिकुल भौगोलिक परिस्थितीमुळे दुर्गम भागात फारशी शेती करता येत नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना औषधी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रतिकुल भौगोलिक परिस्थितीमुळे दुर्गम भागात फारशी शेती करता येत नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना औषधी वनस्पतींवर उदरनिर्वाह करावा लागतो. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५० टक्केपेक्षा अधिक किमती घटल्यामुळे नागरिकांचा उदरनिर्वाह संकटात सापडला आहे.धडगाव व मोलगी भागात बागायती शेतींचा अभाव आहे, त्यातच सिंचनायोग्य पाऱ्याची कुठलीही सुविधा नसल्यामुळे या भागातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. डोंगर-उतार, दगड-गोट्यांच्या शेतजमिनी असल्यामुळे शेतातील उत्पादन अत्यल्प असते. त्या उत्पन्नावर कुठल्याच कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. वर्षभराच्या पोटापाण्यासाठी प्रत्येक कुटुंबांकडून किरकोळ पिके, स्थलांतरीत मजूरी व राना-वनातील औषधी वनस्पतींवर अवलंबून राहावे लागत आहे.यंदा खरीप हंगामातील किरकोळ शेतीची कामे आटोपून काही नागरिक रोजगारासाठी परजिल्हा व परराज्यात स्थलातरीत झाले आहेत. तर मुळगावी थांबलेल्या नागरिकांकडून पावसाळ्याच्या कालावधीत रानावनात उगलेल्या औषधी वनस्पती, त्यांच्या बिया, पाला, मुळे, साली, फुले गोळा करण्यात येत आहे. हे सर्व घटक औषधे निर्मितीसाठी वापरले जात असल्याचे धडगाव व मोलगी बाजारपेठेतील व्यापाºयांमार्फत सांगण्यात येते. आयुर्वेद तथा आरोग्याच्या दृष्टीने हे सर्वच घटक मोलाचे ठरतात. परंतु यंदाच्या हंगामात त्यांना दोन्ही बाजारपेठेत समाधानकारक भाव मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.दुर्गम भागात गोळा केले जाणाºया कुठल्याच औषधी वनस्पतींना बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्यामुळे या वनस्पींवर उदरनिर्वाह करणाºया कुटुंबांचे आर्थिक गणित चुकत आहे. वर्षभरासाठी याच कालावधीत नियोजन केल्यास वर्षभर पोटापाण्याचा फारसा प्रश्न उद्भवत नाही. परंतु या वनस्पींपासून मिळणाºया उत्पदनालाच योग्य भाव मिळत नसल्याने कुटुंबच संकटात सापडले असल्याचे म्हटले जात आहे.४दुर्गम भागात कडू जिरा याची वनस्पती देखील आढळून येत आहे. ही वनस्पती राना-वनाचत नव्हे तर काही शेतकºयांकडून त्यांची शेतातही लागवड करण्यात येत आहे. या नवस्पतीपासून मिळणाºया मालाला मागील वर्षी २५० रुपये प्रतीकिलो भाव दिला जात होता. याच उत्पादनाला यंदा केवळ ६० रुपये प्रतीकिलोला भाव दिला जात आहे. त्यामुळे यात ७४ टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादकाच्या नाकी नऊ येत आहे.४धडगाव व मोलगी येथील व्यापाºयांमार्फत खरेदी करण्यात येणारी औषधी वनस्पती ही प्रामुख्याने इंदैरच्या बाजारपेठेत पाठवली जात आहे. तेथून भारतभरातील औषधी कंपन्यांमार्फत खरेदी केली जात आहे.