शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
Top Marathi News Live: इराणने अमेरिकेला पाठवला नवा प्रस्ताव, पाकिस्तान मध्यस्थ
3
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
4
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
5
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
6
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
7
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
8
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
9
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
10
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
11
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
12
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
13
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
14
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
15
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
16
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
17
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
18
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
19
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
20
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दहा जण कोरोना मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार/नंदुरबार : जिल्ह्यातील १० जण कोरोनामुक्त झाले आहेत़ यात सर्वाधिक सहा जण तळोदा येथील आहेत़ तर ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार/नंदुरबार : जिल्ह्यातील १० जण कोरोनामुक्त झाले आहेत़ यात सर्वाधिक सहा जण तळोदा येथील आहेत़ तर नंदुरबार शहर, मंदाणे व लोणखेडा ता़ शहादा आणि मोलगी ता़ अक्कजकुवा येथील प्रत्येकी एक जण कोरोनामुक्त झाला आहे़मुंबई येथून परतलेल्या कोरोनाची लक्षणे असणाऱ्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीय व अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात मयत महिलेच्या मुलाचा अहवाल सर्वप्रथम पॉझिटिव्ह आला होता़ दरम्यान त्याच्या संपर्कातील सहा जणांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्क साखळीत १३ जणांना कोरोनाची लागण झाली होती़यातील तब्बल सहा जणांनी कोरोनाशी लढा देत त्यावर मात केली आहे. यात मोठा माळीवाडा भागातील चार, काकाशेठ गल्ली एक तर शिवराम नगरातील एक अशा सहा जणांचा समावेश आहे़ शनिवारी महिलेच्या मुलाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर उर्वरित बारा जणांपैकी सहा जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने ते शहरवासीयांसाठी दिलासादायक वृत्त ठरले आहे. असे असले तरी १४ दिवस त्यांना क्वारंटाईन राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, २५ जून रोजी तळोदा येथील मीरा कॉलनीतील एका दाम्पत्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे तळोद्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५ वर गेली होती. आता त्यातील सात जण कोरोणामुक्त झाले असून आठ जणांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान नंदुरबार शहरातील मण्यार मोहल्ला येथील १, मंदाणे व लोणखेडा ता़ शहादा येथील प्रत्येकी एक आणि मोलगी येथील एक अशा चौघांनाही रविवारी घरी सोडण्यात आले़ सर्व १० रुग्णांना आरोग्य विभागाने सन्मानपूर्वक शुभेच्छा देत घराकडे रवाना केले़