शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे व विक्रेत्यांची तपासणीसाठी तालुकास्तरावर पथक कार्यान्वीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

ग्रामीण भागात कांद्याचे गावरान बियाणे विक्री करण्यासाठी बोगस विक्रेते येत आहेत. तरी हे बियाणे कोणत्याही अधिकृत किंवा नोंदणीकृत व्यवसाय ...

ग्रामीण भागात कांद्याचे गावरान बियाणे विक्री करण्यासाठी बोगस विक्रेते येत आहेत. तरी हे बियाणे कोणत्याही अधिकृत किंवा नोंदणीकृत व्यवसाय व उद्योगाचे विक्रेते नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यामुळे संबंधित सूत्रधाराचा छडा लावण्यास अवघड होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बोगस विक्रेत्यापासून सावध राहिले पाहिजे. जेणेकरून फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहेत.

शहादा तालुक्यात कारवाई

शहादा तालुक्यातील सांरगखेडा येथे कृषी विभागाने धाड टाकून नारायण गिरासे गावात छुप्या पद्धतीने महाराष्ट्र राज्यात विक्री करण्यास बंदी असलेले एच.टी.बी.टी कापूस बियाणे विनापरवाना विक्री करताना आढळून आल्याने त्यांच्या विरोधात सांरगखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडील हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालात एच.टी.बी.टी कापूस बियाण्याचे ५० पॅकेट सापडले असून ५८००० किमतीचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, एन. डी. पाडवी आदी पथकातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी अधिकृत दुकांनावरून बियाणे खरेदी करावे. बोगस बियाणे विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी तालुकास्तरावर पथके नेमण्यात आली असून तपासणी पथकांना काही गैरप्रकार आढळले तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

- नीलेश भागेश्वर, जिल्हा कृषी अधीक्षक, नंदुरबार.