दीड लाख घरांना पथकांच्या भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:36 PM2020-09-28T12:36:50+5:302020-09-28T12:37:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत आरोग्य पथकांनी जिल्ह्यातील एक लाख ५७ हजार २६० घरांना भेटी ...

Team visits to 1.5 lakh households | दीड लाख घरांना पथकांच्या भेटी

दीड लाख घरांना पथकांच्या भेटी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत आरोग्य पथकांनी जिल्ह्यातील एक लाख ५७ हजार २६० घरांना भेटी देऊन सहा लाख ९४ हजार ६९३ व्यक्तींची आरोग्य तपासणी केली आहे. रविवारी १८ हजार घरातील ८२ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. घरोघरी पथके जात असल्याने आरोग्य तपासणी पुर्णपणे होत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
आरोग्य पथक घरोघरी जाऊन ताप आणि आॅक्सिजन पातळीची तपासणी करीत आहे. त्याचबरोबर इतरही आजार असल्यास त्याबाबत नोंद घेऊन मार्गदर्शनही करीत आहे. नागरिकांना कोरोना प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबतही माहिती देण्यात येत आह
अक्कलकुवा तालुक्यातील ७७ हजार ५८६, धडगाव एक लाख १२ हजार ७६५, नंदुरबार ग्रामीण ८९ हजार ८९५, नंदुरबार शहरी ४३ हजार ३४९, नवापूर ग्रामीण एक लाख १२ हजार ७३, नवापूर शहर १५ हजार २३०,  शहादा ग्रामीण एक लाख ४८ हजार ३५२, शहादा  शहर २४ हजार ६७५, तळोदा ग्रामीण ५६ हजार ६३८ आणि तळोदा शहरातील १४ हजार १३० नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तापाच्या रुग्णांना उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे.
सर्वेक्षणासाठी अक्कलकुवा तालुक्यात ६९, धडगाव ६३, नंदुरबार १०४, नवापूर ७९, शहादा १२२ आणि तळोदा तालुक्यात ४५ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी पथकाला सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. प्रत्येक घरापर्यंत जाऊन मोहिम संपविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Team visits to 1.5 lakh households

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.