शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्सी चालकांच्या वादातून तळोदा ते शहादा टॅक्सीभाडे झाले दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

शहादा येथील टॅक्सी चालक तळोदा येथे प्रवासी घेऊन आल्यानंतर, टॅक्सी स्टँडवर न येता, प्रवासी उतरवून शहरातील विविध चौकांत ...

शहादा येथील टॅक्सी चालक तळोदा येथे प्रवासी घेऊन आल्यानंतर, टॅक्सी स्टँडवर न येता, प्रवासी उतरवून शहरातील विविध चौकांत नंदुरबारकडे जाणारे प्रवासी शोधतात. यातून तळाेदा येथील मूळ गाडीमालकांना नंदुरबारचे प्रवासी मिळत नाहीत. शहादा येथील चालक तळोद्यातून नंदुरबारचे प्रवासी पळवत असल्याने सातत्याने वाद सुरू झाले आहेत. याबाबत तळोदा टॅक्सी युनियनने शहादा युनियनसोबत पत्रव्यवहारही केला आहे, परंतु यानंतरही हा प्रकार थांबलेला नाही. तळोेदा येथील चालकांना प्रवासीच मिळत नसल्याने ते शहादा किंवा नवापूर जाताना परतीचेही भाडे मागणी करत असल्याचे प्रकार यातून होत आहे.

यातून नंदुरबार ते तळोदा या प्रवासासाठी एका प्रवाशाला साधारण १५० रुपये द्यावे लागत आहे. वास्तवित तळोदा ते नंदुरबार या मार्गाचे प्रवास भाडे हे माफक ४० रुपये आहे, परंतु लाॅकडाऊन काळात हा दर ७५ रुपये एवढा करण्यात आला होता, परंतु आता थेट दुप्पट भाडे झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, तळोदा येथील टॅक्सी चालक-मालकांना नंदुरबार येथील चालक-मालक गाड्या भरू देत नसल्याची माहिती देण्यात आली आहे. यातून तळोदा येथील टॅक्सी चालकांची वाहने रिकामीच रहात असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट आल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकारातून मात्र प्रवाशांचे हाल होत असल्याने संबधित विभागाने तातडीने कारवाई करण्याची मागणी आहे.

याबाबत तळोदा टॅक्सी युनियनचे सदस्य अजय सोनवणे यांची सांगितले की, शहादा येथील टॅक्सी चालकांनी तळोदा येथील टॅक्सी केबिनमध्येपूर्वीप्रमाणे वाहन उभी करावीत. त्यांच्याकडून सुरू असलेल्या मनमानी वाहतुकीमुळे तळोद्यातील टॅक्सीचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.