शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तापी नदी दुथडी; पंचक्रोशीत मात्र ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:25 IST

प्रकाशा : येथील तापी नदीला पूर आला असून, प्रकाशा बॅरेजचे १० गेट पूर्णक्षमतेने उघडले असल्याने एक लाख २५ ...

प्रकाशा : येथील तापी नदीला पूर आला असून, प्रकाशा बॅरेजचे १० गेट पूर्णक्षमतेने उघडले असल्याने एक लाख २५ हजार ६६४ क्‍यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मात्र; प्रकाशा पंचक्रोशीत पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत ६५ मि.मी. पाऊस झाल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.

याबाबत असे की, हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने शुक्रवारी सकाळी सहा वाजता हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले. त्यामुळे प्रकाशा येथील बॅरेजला रात्री सात वाजेपासून पाणी येण्यास सुरुवात झाली. तेव्हा प्रकाशा बॅरेजने सहा गेट उघडले होते. मात्र पाण्याची क्षमता वाढल्याने प्रकाशा बॅरेजचे सकाळी सहा वाजता १० गेट पूर्ण क्षमतेने उघडले आहेत. त्यातून एक लाख २५ हजार ६६४ क्‍यूसेस पाणी विसर्ग करण्यात येत आहे.

प्रकाशा येथील तापी नदीला १०७ मीटर पाणी स्टेबल करण्यात आले आहे. यामुळे तापी नदी दोन्ही काठ दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे महसूल व ग्रामपंचायतीकडून नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तापी नदीमध्ये या वर्षी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने पाणी बघण्यासाठी पंचक्रोशीतील लोक गर्दी करीत आहेत.

पंचक्रोशीत पाऊस नसल्याने ठणठणाट व शेतकरी चिंतातूर

कृषी विभाग म्हणतं १०० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. त्यामुळे प्रकाशा परिसरात जवळपास अजूनही पेरणी बाकी आहे.

प्रकाशा येथील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये पर्जन्यमापक आहे. तेथील नोंदणीनुसार ६ जूनपासून आतापर्यंत ६५ मि.मी. पाऊस झालेला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात १३० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. मात्र प्रकाशासह पंचक्रोशीत ६५ मि.मी. पाऊस झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. अजून जवळपास ९० टक्के पेरणी बाकी आहे. ज्यांनी पेरणी केली आहे. त्यांच्या पिकांनाही पाणी मिळत नसल्याने पीक वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, एवढं करून ही पाऊस येत नाही म्हणून शेतकरी संकटात सापडला आहे.

ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली व ज्यांनी पेरणी केली नाही तेही संकटात सापडल्याचे चित्र प्रकाशा शिवारात दिसून येत आहे. प्रकाशासह इतर गावातही दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, ज्वारी, तूवर, मूग, सोयाबीन, कापसाची ज्यांनी पेरणी केलेले आहे. त्या पिकांना पावसाळ्याचे पाणी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. ज्यांनी पेरणी केली तेदेखील संकटात सापडलेले आहे. अशाप्रसंगी कृषी विभागाने व महसूल विभागाने लक्ष देऊन प्रकाशासह पंचक्रोशीत दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

प्रकाशासह पंचक्रोशीत पाऊस नाही. तसेच जिल्ह्यात १३० मि.मी. पाऊस झाला असला तरी प्रत्यक्षात प्रकाशा परिसरात पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. एकीकडे कृषी विभाग १०० मी.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे सांगत असलल्याने आमच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्यांनी प्रेरणी केली आहे. त्यांनादेखील पाऊस नसल्याने पीक वाचविण्यासाठी शर्थींचे प्रयत्न करावे लागत आहे. तेव्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे. -हरी दत्तू पाटील, शेतकरी, प्रकाशा

प्रधानमंत्री राष्ट्रीय विमा योजनेची मुदत १५ जुलैपर्यंत होती. मात्र, पुन्हा शासनाने वाढवून ती २३ जुलै केली. परंतु प्रकाशा परिसरात पाऊसच नसल्याने आम्ही पेरणी केलेली नाही. पुढे पाऊस चांगला झाल्यास पीकविमा योजनेची मुदतवाढ करून द्यावी, अशी आमची मागणी आहे - किशोर बुलाखी चौधरी, शेतकरी, प्रकाशा