शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा पालिकेने पशुपालकांना सूचना देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST

शहरातील मोकाट जनावरांसाठी नगरपालिकाने कोंडवाडा तयार करावा व जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत ...

शहरातील मोकाट जनावरांसाठी नगरपालिकाने कोंडवाडा तयार करावा व जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. विशेषतः कळपाकळपाने फिरणारी ही जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अनेकदा एखादे मोकाट जनावर फिरण्यासाठी आलेल्या नागरिकावर धावूनही जाते. त्यामुळे पळापळही होते. यातून अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यात अनेकजण जखमी होतात. कोंडवडा नसल्यामुळे जनावर मालकांवर कुठलाही प्रकारचा धाक राहिलेला नाही.

शहरातील प्रमुख रस्ते, स्मारक, चौक व कॉलनीदेखील मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. हे कुत्रेदेखील झुंडीने फिरतात. अनेक विद्यार्थी शिकवणीसाठी जात असतानाही त्यांच्या अंगावर धावून जात असतात. या मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे शिकवणीला जाण्यासाठी मुले आता घाबरायला लागली आहेत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे नागरिक अधिक धास्तवाले आहेत. मोकाट कुत्र्यांवर नगरपालिकाने निर्बिजीकरणाची मोहीम राबवून, प्रभावीपणे काम हाती घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वराहाच्या उपद्रवाने नागरिक हैराण

गेल्या काही दिवसांत वराहांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अनेकवेळा ही जनावरे रस्त्यावर भटकंती करत असताना वाहनधारकांच्या समोर येत असल्याने अपघाताच्या घटना घडत असतात.