शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेडा थांब्यावर बसचा दीड तास खोंळबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 11:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : यंदा देऊर, टेंभा व खैरवे येथील विद्यार्थी संख्या वाढल्याने एकाच बसने सर्व विद्यार्थी जाणे ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : यंदा देऊर, टेंभा व खैरवे येथील विद्यार्थी संख्या वाढल्याने एकाच बसने सर्व विद्यार्थी जाणे शक्य नसल्याने बुधवारी संध्याकाळी सारंगखेडा बसथांब्यावर विद्यार्थी बसमध्ये बसण्यावरून दीड ते दोन तास खोळंबा चालला. या बसमध्ये अक्षरश: चेंगराचेंगरी होत होती.    शहादा तालुक्यातील देऊर, टेंभा व खैरवे येथील विद्यार्थी शिक्षणासाठी सारंगखेडा व शहादा येथे प्रवास करतात. विद्यार्थी संख्या जास्त तर बस मात्र एकच. पुरेशा बसेस उपलब्ध नसल्याने बसच्या क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी त्यात दाटीवाटीने घुसतात. यामुळे विद्याथ्र्याच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. बसमध्ये चढताना किंवा उतरताना अनेकदा विद्याथ्र्यामध्ये वाद विकोपाला जातात ते टाळण्यासाठी अतिरिक्त बस सुरू होणे आवश्यक आहे. 60 सीट क्षमता असणा:या बसमध्ये 130 विद्यार्थी कसे बसतील. शाळा सुटल्यानंतर  संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेदरम्यान विद्याथ्र्याची गर्दी सारंगखेडा बसथांब्यावर जमून बसची वाट पाहतात. घरी पोहोचण्याच्या घाईने विद्याथ्र्याची  बसमध्ये चढण्यासाठी एकच गर्दी होते. त्यामुळे अपघात व वाद  विकोप्याला जातात. होणारे वाद व शाळा-महाविद्यालयाच्या वेळेचे भान ठेवून अप्रिय घटना घडण्यापूर्वीच शहादा आगार प्रमुखांनी लक्ष घालून विद्याथ्र्याच्या शिक्षणाबरोबरच जीवाचाही विचार करुन जादा बसेस सुरू करुन विद्याथ्र्यांचे होणारे हाल कमी करावेत, अशी मागणी जोर धरत आहे. अनेकदा  बसमध्ये जागा नसल्याने विद्याथ्र्याना रात्री उशिरार्पयत बसथांब्यावर ताटकळत रहावे लागते. बुधवारी सायंकाळी बसमध्ये बसण्यावरून असाच वाद होऊन या बसचा दीड ते दोन तास खोळंबा झाला. चालक-वाहक व सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मध्यस्थीने शहादा आगार प्रमुखांना दूरध्वनीवरून कळवून दुसरी बस मागवून या विद्याथ्र्याना रवाना करण्यात आले. याबाबत शहादा आगार प्रमुखांनी गंभीर दखल घेऊन या मार्गावर विद्याथ्र्याच्या सोयीनुसार जादा बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी विद्याथ्र्यासह देऊर, टेंभा व खैरवे येथील पालकांकडून  करण्यात आली आहे.