नियंमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 12:26 IST2020-04-08T12:26:28+5:302020-04-08T12:26:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील सदस्यांना मोफत तांदूळ वितरण करताना नियमांचे ...

Take action if I violate the rules | नियंमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करु

नियंमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करु

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील सदस्यांना मोफत तांदूळ वितरण करताना नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिला आहे़ जिल्हा कार्यालयातील बैठकीत त्यांनी रेशन दुकानदारांसोबत संवाद साधत विविध सूचना दिल्या़
कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात रास्त भाव दुकानदार संघटनांचे प्रतिनिधी, गॅस एजन्सी संचालक, केरोसीन अर्धघाऊक विक्रेत्यांची बैठक मंगळवारी घेण्यात आली़ बैठकीस सहायक जिल्हाधिकारी अविशांत पांडा, वसुमना पंत, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांच्यासह सर्व तालुक्यांचे तहसीलदार अणि नायब तहसीलदार उपस्थित होते़ बैठकीत धान्य वाटपाचा आढावा घेण्यात आला.
पुढे बोलताना डॉ.राजेंद्र भारुड यांनी सांगितले की, केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत तांदूळ उपलब्ध करून दिल्याने लभार्थीला एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंर्तगत अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे़ रास्त भाव दुकानदारांनी वाजवीपेक्षा जास्त दर आकारणी करू नये, एप्रिलमध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थींना नियमित नियतन वाटप होईल यासाठी ई-पॉस मशिनवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या मोफत तांदळाचे वाटप लाभार्थींना करण्यात यावे अशा सूचना त्यांनी केल्या़


उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत लाभार्थींना मोफत सिलींडर देण्याच्या सूचना तसेच केरोसिन विक्रेत्यांनी केरोसिन वाटप करताना फोटो किंवा व्हिडीओद्वारे नोंद ठेवावी व पात्र लाभार्थींनाच केरोसिन मिळेल याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत केल्या़ बैठकीत मोफत वितरण केलेल्या धान्याची पावती दुकानदारांनी सांभाळून ठेवण्याबाबत पुरवठा विभागाने सूचना दिल्या़

Web Title: Take action if I violate the rules