मंच्युरियन देण्याच्या वादातून डोक्यात टेबलच घातला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 12:09 IST2020-01-24T12:09:31+5:302020-01-24T12:09:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विक्रेत्याने मंच्युरियन देण्यास उशीर केल्याचा वाद सोडविण्यास गेलेल्या एकाच्या डोक्यात टेबल मारून गंभीर जखमी ...

The table was laid in the head by the promise of giving Manchurian | मंच्युरियन देण्याच्या वादातून डोक्यात टेबलच घातला

मंच्युरियन देण्याच्या वादातून डोक्यात टेबलच घातला

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विक्रेत्याने मंच्युरियन देण्यास उशीर केल्याचा वाद सोडविण्यास गेलेल्या एकाच्या डोक्यात टेबल मारून गंभीर जखमी केल्याची घटना नंदुरबारातील संजय टाऊन हॉलनजीक घडली.
शहरातील संजय टाऊन हॉलजवळ लक्ष्मण कोंडाजी गवळी हे मंच्युरियनची विक्रीचे दुकान चालवितात. या ठिकाणी नयन भदाणे व त्याचा मित्र मंच्युरियन घेण्यासाठी आले. मंच्युरियन देण्यावरून त्यांच्यात वाद झाला. सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी अतुल हरी गवळी हे त्या ठिकाणी आले. त्यांनी भदाणे व त्यांच्या मित्राला समजविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग येवून नयन भदाणे व रोहित नावाच्या त्याच्या मित्राने दुकानातील लोखंडी टेबल उचलून थेट अतुल गवळी यांच्या डोक्यात घातला. तर रोहित याने लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत अतुल गवळी गंभीर जखमी झाले. त्यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The table was laid in the head by the promise of giving Manchurian