शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
4
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
5
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
6
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
9
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
10
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
11
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
12
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
13
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
14
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
15
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
16
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
17
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
20
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांचा २६ ला लाक्षणिक संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 12:07 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  राज्‍य सरकारी कर्मचारी महासंघातर्फे २६ नोंव्‍हेबर रोजी अस्वस्थ राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांचा ...

n  लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  राज्‍य सरकारी कर्मचारी महासंघातर्फे २६ नोंव्‍हेबर रोजी अस्वस्थ राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांचा देशव्यापी लाक्षणिक संप होणार आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीत संप यशस्वी करण्याचा निर्धार केला.
विविध मागण्यांसाठी २६ नोव्हेंबर रोजी देशातील कामगार, कर्मचारी, शिक्षक देशव्यापी लाक्षणिक संपावर जाणार आहेत. यात सर्वांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करा, खाजगीकरण-कंत्राटीकरण धोरणे रद्द करून सध्याच्या अंशकालीन व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे जाचक धोरण रद्द करा, कामगार कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावणारे नवीन कामगार कायदा रद्द करा,  केंद्रीय कर्मचाऱ्याना देय ठरणारे सर्व भत्ते राज्य कर्मचाऱ्यांना मंजूर करा, सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरा व ही पदे भरतांनाच अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या विना अट करा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक-कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवा, वेतन श्रेणी त्रूटी दूर करण्या संदर्भात बक्षी समितीचा अहवालाचा दुसरा खंड तात्काळ जाहीर करा, अन्यायकारक शेतकरी कायदे रद्द करा, दरमहा सात हजार ५०० बेरोजगार भत्ता मंजूर करा व प्रत्येक गरीब व्यक्तिला दरमहा १० किलो अन्नधान्यपुरवठा करा, प्रत्येक गरजू व्यक्तिला मनरेगा मार्फत किमान २०० दिवसाचा रोजगार मिळेल असे धोरण लागू करा, इतर सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संबंधित संवर्ग संघटनेच्या प्रतिनिधींसोबत निर्णायक चर्चा करावी, अशी रास्त अपेक्षा मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांना दिलेल्‍या निवेदनात केली आहे.
बैठकीस जिल्‍हाध्‍यक्ष हेंमत देवकर, हेमंत मरसाळे, एस.एन. पाटील, ओम कुलकर्णी, दिनेश रणदिवे, एम.डी. महिरे, सैय्यद इसरार अली, डी.पी. महाले, तुषार सोनवणे, हिरालाल घुले, भरत शिंदे, संजय पाटील, संदीप रायते, पवन शेटे उपस्थित होते.