नगाव ,तिसी येथे ग्रामस्थांचे स्वॅब संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST2021-04-29T04:22:46+5:302021-04-29T04:22:46+5:30

भालेर : तालुक्यातील नगाव व तिसी येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीमार्फत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. ...

Swab collection of villagers at Nagaon, Tisi | नगाव ,तिसी येथे ग्रामस्थांचे स्वॅब संकलन

नगाव ,तिसी येथे ग्रामस्थांचे स्वॅब संकलन

भालेर : तालुक्यातील नगाव व तिसी येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीमार्फत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामस्थांनी आरोग्यविषयक काळजी घेणे, कोरोना लक्षणे असलेल्या नागरिकांना मार्गदर्शन करणे तसेच नगाव तिसी जिल्हा परिषद शाळेत ग्रामस्थांचे स्वॅब संकलन शिबिर आयोजित करुन ९६ ग्रामस्थांच्या स्वॅबचे नमुने संकलित करण्यात आले. यावेळी नगावच्या सरपंच रत्नाबाई धनगर, तिसीच्या सरपंच कल्पना पाटील, ग्रामविकास अधिकारी भरत निकुंभे, मनिषा गढरी, तलाठी अतुलकुमार पवार, स्वॅब संकलक डाॅ. प्रशांत सूर्यवंशी, डाॅ. राकेश पाटील, ए. एन. एम. अर्चना ओगले, लक्ष्मी माळी, आशा सेविका मनिषा गोसावी, चंद्रकला पाटील. हर्षल पाटील, विठोबा पाटील, महादू गोसावी उपस्थित होते. हा कार्यक्रम जनतेच्या हिताचा असून, सर्व ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी करुन स्वॅब देण्याचे आवाहन नगाव व तिसी ग्रामपंचायतींमार्फत केले आहे. या शिबिरात नमुने घेतलेल्या ग्रामस्थांना मास्कचे वाटप करण्यात आले.

Web Title: Swab collection of villagers at Nagaon, Tisi