शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये वाढदिवस साजरा करणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा शहरालगतच्या एका वसाहतीमागील शेतात लॉॅकडाऊन काळात वाढदिवसाची पार्टी करणे ‘बर्थडे बॉय’ला महागात पडले ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा शहरालगतच्या एका वसाहतीमागील शेतात लॉॅकडाऊन काळात वाढदिवसाची पार्टी करणे ‘बर्थडे बॉय’ला महागात पडले आहे़ पोलीसांना गर्दी दिसून आल्यानंतर त्यांनी याठिकाणी छापा मारल्यावर हा प्रकार समजून आला होता़ ३ जुलै रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़तळोदा शहरालगत चंदनव्हिला अपार्टमेंट या रहिवासी वसाहतीमागे ३ जुलै रोजी गर्दी जमली असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती़ त्यानुसार निरीक्षक राजेश शिंगटे, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, पोलीस नाईक रविंद्र कोराळे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल पाडवी, रघुवंशी रामोळे यांनी याठिकाणी पाहणी केली असता, गर्दी दिसून आली होती़ दरम्यान पोलीसांची गाडी येत असलेली पाहून शेतात जमलेले १० ते १२ जणांनी पळ काढला होता़ पोलीस कर्मचारी कोराळे यांनी पाठलाग केल्यावर एकास ताब्यात घेण्यात आले होते़ त्याने गणेश सुरेश सोनार रा़ मेनरोड तळोदा अशी ओळख दिली होती़ त्याची विचारपूस केल्यास त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रकंपनी जमल्याची माहिती दिली़घटनेची गांभिर्य लक्षात घेत साथ रोग कायद्याचे उल्लंघन व मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजय कोळी यांच्या फिर्यादीवरुन संशयित गणेश सोनार याच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़या प्रकाराची तळोदा शहरात एकच चर्चा सुरू असून पोलीसांची गाडी असताना केक कापणे सुरू होते़ पोलीसांच्या भितीने केक न कापताच सर्वजण पळत सुटल्याची माहिती आहे़