शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वेळ संपल्याने सुप्रिया गावीत अर्ज दाखल करण्यापासून वंचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा मतदारसंघात उमेदवारी करू इच्छिणा:या तथा आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या कन्या डॉ.सुप्रिया गावीत या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा मतदारसंघात उमेदवारी करू इच्छिणा:या तथा आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या कन्या डॉ.सुप्रिया गावीत या निर्धारित वेळेनंतर पाच मिनिटे उशीरा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पोहचल्याने त्यांना अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्तेही नाराज झाले. अक्कलकुवा मतदारसंघात डॉ.सुप्रिया विजयकुमार गावीत यांच्या उमेदवारीची चर्चा होती. त्यादृष्टीने चाचपणी देखील झाली होती. त्या शुक्रवारी दुपारी अर्ज दाखल करण्यास जाणार होत्या. त्यामुळे कार्यकर्ते त्यांची वाट पहात होते. अर्ज दाखल करण्यासाठी त्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पोहचल्या. परंतु अर्ज दाखल करण्याची वेळ तीन वाजेची असतांना त्या तीन वाजून पाच मिनिटांनी पोहचल्या. त्यामुळे त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला गेला नाही. त्यांच्यासोबत वडिल डॉ.विजयकुमार गावीत देखील होते. यामुळे त्या नाराज झाल्या. दरम्यान, त्यांच्या उमेदवारीसाठी कार्यकत्र्यानी शिवसेनेकडून आणि अपक्ष असे दोन अर्ज गुरुवारी निवडणूक कार्यालयातून घेतले होते. त्यांच्या उमेदवारीकडे राजकीय वतरूळाचे लक्ष लाूगन होते.