वेळ संपल्याने सुप्रिया गावीत अर्ज दाखल करण्यापासून वंचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 12:05 IST2019-10-05T12:04:46+5:302019-10-05T12:05:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा मतदारसंघात उमेदवारी करू इच्छिणा:या तथा आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या कन्या डॉ.सुप्रिया गावीत या ...

Supriya Gavit refuses to file application due to expiration of time | वेळ संपल्याने सुप्रिया गावीत अर्ज दाखल करण्यापासून वंचीत

वेळ संपल्याने सुप्रिया गावीत अर्ज दाखल करण्यापासून वंचीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा मतदारसंघात उमेदवारी करू इच्छिणा:या तथा आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या कन्या डॉ.सुप्रिया गावीत या निर्धारित वेळेनंतर पाच मिनिटे उशीरा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पोहचल्याने त्यांना अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्तेही नाराज झाले. 
अक्कलकुवा मतदारसंघात डॉ.सुप्रिया विजयकुमार गावीत यांच्या उमेदवारीची चर्चा होती. त्यादृष्टीने चाचपणी देखील झाली होती. त्या शुक्रवारी दुपारी अर्ज दाखल करण्यास जाणार होत्या. त्यामुळे कार्यकर्ते त्यांची वाट पहात होते. अर्ज दाखल करण्यासाठी त्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पोहचल्या. परंतु अर्ज दाखल करण्याची वेळ तीन वाजेची असतांना त्या तीन वाजून पाच मिनिटांनी पोहचल्या. त्यामुळे त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला गेला नाही. 
त्यांच्यासोबत वडिल डॉ.विजयकुमार गावीत देखील होते. यामुळे त्या नाराज झाल्या. दरम्यान, त्यांच्या उमेदवारीसाठी कार्यकत्र्यानी शिवसेनेकडून आणि अपक्ष असे दोन अर्ज गुरुवारी निवडणूक कार्यालयातून घेतले होते. त्यांच्या उमेदवारीकडे राजकीय वतरूळाचे लक्ष लाूगन होते.


 

Web Title: Supriya Gavit refuses to file application due to expiration of time