डाकीणीच्या संशयाने भयभीत विद्यार्थिंनीना ममत्त्वाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:33 IST2020-01-31T12:33:43+5:302020-01-31T12:33:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोहिदा शिवारात शासकीय आदिवासी मुलींच्या वसतीगृह परिसरात डाकीण किंचाळण्याचा आवाज ऐकू येत असल्याचा व्हिडिओ ...

Support for students in fear of robbery | डाकीणीच्या संशयाने भयभीत विद्यार्थिंनीना ममत्त्वाचा आधार

डाकीणीच्या संशयाने भयभीत विद्यार्थिंनीना ममत्त्वाचा आधार


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मोहिदा शिवारात शासकीय आदिवासी मुलींच्या वसतीगृह परिसरात डाकीण किंचाळण्याचा आवाज ऐकू येत असल्याचा व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती़ यामुळे विद्यार्थिनी भयभीत झाल्या होत्या़ भेदरलेल्या विद्यार्थिनींची स्थिती समजल्यानंतर शहाद्यातील महिलांनी त्यांची भेट घेत आधार दिला़
शहादा शहरात गेल्या काही दिवसांत व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात मोहीदा येथील आदिवासी मुलींच्या वसतीगृहातील मुलींना ऐकू आलेला ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज रेकॉर्ड केलेला होता. त्या आवाजामुळे वसतीगृहातील मुली घाबरल्या असल्याची माहिती अंनिसच्या शहादा शाखेला मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून अंनिसच्या संगिता पाटील, भारती पवार, सुवर्णा जगताप तसेच पंचायत समितीच्या माजी सभापती वनिताताई पटले, जनार्थ आदिवासी विकास संस्थेचे कार्यकर्ते चुणीलाल ब्राम्हणे यांनी तातडीने विद्यार्थिनींची भेट घेतली़ वसतीगृहातील सर्व मुलींशी चर्चा केल्यानंतर केवळ तीन मुलींनी हा आवाज ऐकला असून 'येथे डाकीण ओरडते आहे' अशी मनाची समजूत करून घेत इतरांना तीच भिती घातली होती़ यातून हा प्रकार फोफावला होता़ अंनिस कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी डाकीण अस्तित्त्वात नसल्याने समजावून देत वैज्ञानिक दृष्टीने घटनेचा विचार कसा करावा, मनातील भिती, नकारात्मक व चुकीचे विचार दूर करुन सकारात्मक विचार करसा करावा आदी बाबी उदारणांद्वारे पटवून दिले़ सुमारे दोन तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या समुपदेशनानंतर विद्यार्थिनींनी अजिबात घाबरणार नाही, असा काही प्रकार घडल्यास खात्री करु असे सांगितले़ दरम्यान हा प्रकार खोडसाळपणातून केला गेला असावा असाही अंदाज आहे़

Web Title: Support for students in fear of robbery