शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवार मध्यरात्रीपासून कलम १४४ लागू करण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवार मध्यरात्रीपासून कलम १४४ लागू करण्याची घोषणा केली आहे. जिल्ह्यातदेखील याची अंमलबजावणी करण्यात येणार असून या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहील, त्यात कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.सोमवारी पहाटे पर्यंत नागरिकांना घराबाहेर पडण्यास अनुमती रहाणार नाही. त्यानंतरदेखील गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्ह्यात शहरी भागात १४४ कलम लागू करण्यात येणार असून ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी असणार नाही. नागरिकांनी एकत्र फिरू नये किंवा एकाच ठिकाणी गर्दी करू नये. आदेशाचे उल्लंघन करणाºया व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची सेवा आणि बँका सुरू राहतील. बाहेरील वाहनांना जिल्ह्यात प्रवेश असणार नाही. अशावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिसांच्या संपर्कात राहून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाºया वाहनांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल याचे नियोजन करावे. नागरिकांना आवश्यक वस्तू योग्यप्रकारे मिळतील याकडेदेखील विशेष लक्ष देण्यात यावे. नागरिकांनी ‘जनता कर्फ्यू’ दरम्यान चांगले सहकार्य केले आहे. विषाणूचा धोका कायमस्वरुपी दूर करण्यासाठी आणखी काही दिवस गर्दी टाळावी लागणार आहे. त्यासाठी नागरिकांनी २३ मार्चपर्यंत बाहेर रस्त्यावर येऊ नये.धार्मिक स्थळाच्या ठिकाणी नेहमीची पूजाअर्चा सुरू राहील, मात्र त्या ठिकाणी नागरिकांना एकत्र येऊ नये. पुढील सुचनेपर्यंत कोणतेही बाजार भरविण्यात येऊ नये. वाहतूक सेवा पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून अथवा परदेशातून आलेल्या नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. ज्या नागरिकांना ‘क्वारंटाईन’ करण्यास सांगितले आहे त्यांनी इतरांपासून स्वत:ला दूर ठेवावे आणि बाहेर फिरू नये. पुढील १५ दिवस ही काळजी घेणे महत्वाचे आहे. दुकाने व इतर आस्थापनांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जिल्हा प्रशासनाकडून पूर्णत: खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनदेखील डॉ.भारूड यांनी केले आहे.जिल्ह्यातील जनतेला धन्यवाद जिल्ह्यातील जनतेने स्वंयस्फुतीर्ने जनता कर्फ्यूत सहभाग घेतला. नागरिकांनी १०० टक्के बंद पाळला व कोणीही घराबाहेर आले नाही. करोनाशी लढण्यासाठी नागरिकांची ही एकजूट उपयुक्त ठरेल आणि त्यामुळे विषाणूचा संसर्ग अधिक प्रमाणत होणार नाही. आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या हितासाठी अहोरात्र दक्षता घेत असून नागरिकांचे सहकार्य त्यांना प्रोत्साहन देणारे ठरेल, असे नमूद करून डॉ.भारूड यांनी जिल्ह्यातील विविध संस्था, अधिकारी, कर्मचारी, उद्योजक, व्यावसायिक आणि जनतेला धन्यवाद दिले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागाने परस्परांना या आजाराची माहिती देत सूचनांचे पालन केले, असे त्यांनी म्हटले आहे. येत्या काळातही सर्वांचे प्रशासनास असेच सहकार्य लाभेल, असा विश्वासही जिल्हाधिकाºयांनी व्यक्त केला.