शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

संडे स्पेशल मुलाखत- कोरोनासाठी आयएमएची स्वतंत्र समिती काम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:40 IST

जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात आयएमए संघटनेचे मोठे योगदान आहे. कोरोनाच्या काळात देखील संघटना योगदान देत आहे. - डॉ.शिरिष शिंदे, नंदुरबार

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरोनाच्या संकटाच्या काळात आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने चांगले काम केले आहे. शासनाच्या प्रत्येक आदेशाचे पालन करीत काम सुरू आहे. सामान्य रुग्णांची गैरसोय होणार नाही यासाठी डॉक्टर मंडळी काम करीत आहे. यासाठी चार सदस्यीय समितीही नेमली आहे. येत्या काळात संघटनेने अनेक नवीन उपक्रम हाती घेतले असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा डॉक्टर असोसिएशनचे नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ.शिरिष शिंदे यांनी सांगितले. त्यांच्याशी झालेली बातचित...कोरोनाला कसे हाताळले जात आहे?जिल्ह्यातील डॉक्टर मंडळींकडे अपुऱ्या सोयी, सुविधा आहेत. जिल्ह्यात मल्टी स्पेशालीटी हॉस्पीटल नाही. अशा तोकड्या साधनांमध्येही जिल्ह्यातील डॉक्टर मंडळींनी कोरोनाच्या संवेदनशील काळात सामान्य रुग्णांची गैरसोय होऊ दिली नाही. सुदैवाने जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव कमी आहे. अ‍ॅक्टीव्ह पेशंट १० ते १५ च्या आतच राहत आहेत. ते यापुढे वाढू नयेत यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.संघटनेने आगामी काळात कोरोनासंदर्भात काय उपक्रम हाती घेतले आहेत.?कोरोना संदर्भात विविध अटी, नियम, कायदे आहेत. दररोज नवनवीन आदेश निघत असतात. त्यामुळे डॉक्टरमंडळी गोंधळून जाते. त्यासाठी आयएमएच्या चार डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींचा समन्वय साधणार आहे. त्यातून आयएमएच्या सदस्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय या समितीच्या माध्यमातूनच जिल्हा आरोग्य यंत्रणेला आवश्यक ते सहाय्य पुरविले जाणार आहे.संघटनेचे इतर काय उपक्रम?राज्यात नंदुरबारच्या संघटनेची वेगळी ओळख आहे ती कायम टिकवून ठेवणार. आरोग्य जागृती, वृक्षारोपण, शिबिरे यासह नवीन तंत्रज्ञानाची माहिती सदस्यांना व्हावी यासाठी वेळोवेळी सेमिनार घेणार आहोत. त्यासाठी तज्ज्ञांना बोलविले जाईल.कोरोनाग्रस्त रुग्णाने ज्या रुग्णालयात उपचार घेतला ते रुग्णालय पूर्वी १४ दिवस बंद ठेवले जात होते. आता नवीन नियमानुसार डॉक्टर व स्टाफचा अहवाल निगेटिव्ह आल्यास दुसºयाच दिवशी सॅनिटाईझ करून रुग्णालय सुरू करता येणार आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.लॉकडाऊन शिथील झाले आहे. व्यवहार सुरळीत होत आहेत. लोकांचे मायग्रेशन आता वाढणार आहे. त्यामुळे येत्या काळात लक्षणे नसलेले अनेक रुग्ण आपल्या आसपास राहणार आहे. अशा रुग्णांपासून दूर राहणे, सर्व आवश्यक त्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे प्रत्येकाला आवश्यक आहे. कुणीही या महामारीला सहज घेवू नका. जिल्हा प्रशासनाच्या चांगल्या कामामुळेच राज्यात सर्वात कमी रुग्ण आपल्या जिल्ह्यात आहेत. हीच स्थिती टिकवून ठेवण्यासाठी आता प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. तरच कोरोनाला आपण नियंत्रणात ठेवू शकणार आहोत.