फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत बँकांनी सहकार्य करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:10 PM2020-02-19T12:10:22+5:302020-02-19T12:10:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती ही महत्वाची योजना आहे. योजनेत पात्र शेतकऱ्यांना बँकांनी योग्य ...

Suggestions by banks to cooperate on flower farmers' debt relief scheme | फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत बँकांनी सहकार्य करण्याच्या सूचना

फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत बँकांनी सहकार्य करण्याच्या सूचना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती ही महत्वाची योजना आहे. योजनेत पात्र शेतकऱ्यांना बँकांनी योग्य ते मार्गदर्शन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी दिल्या़ मंगळवारी योजना अंमलबजावणीनिमित्त जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत त्यांनी या विषयावर मार्गदर्शन केले़
बैठकीस तहसीलदार मिलिंद कुळकर्णी, ज्ञानेश्वर सपकाळे, पंकज लोखडे, सुनिता जºहाड, भाऊसाहेब थोरात, उल्हास देवरे , जिल्हा उपनिंबधक अशोक चाळक, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत देशपांडे, नाबाड चे जिल्हा व्यवस्थांपक प्रमोद पाटील यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी डॉ़ भारुड यांनी योजनेत पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या गावनिहाय ग्रामपंचायत कार्यालय, गावचावडी तसेच तलाठी कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्र, बँकांच्या सर्व शाखा आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सूचना फलकांवर प्रसिध्द करण्याच्या सूचना केल्या़ कर्जमुक्ती योजनेच्या पात्र लाभार्थींची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आधार प्रामाणिकरणासाठी शेतकऱ्यांनी जिल्ह्यात कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र व सामाईक सुविधा केंद्रात जावून सुधारणा करुन घेण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली़ सर्व तहसीलदारांनी तालुकानिहाय आढावा सादर केला़
बँकांच्या अधिकाºयांनी लाभार्थी याद्यांची माहिती दिली़ जिल्ह्यातील लाभार्थी शेतकºयांची नावे यादीत आल्यानंतर करण्यात येणाºया कारवाईवर बैठकीत चर्चा झाली़

Web Title: Suggestions by banks to cooperate on flower farmers' debt relief scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.