शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यातील अनेक गावांतील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नेटवर्कच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST

जयनगर : सलग दुसऱ्या वर्षीही कोरोना महामारीमुळे शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण चालू आहे. शाळा ऑनलाईन सुरू होऊन अर्धा ...

जयनगर : सलग दुसऱ्या वर्षीही कोरोना महामारीमुळे शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण चालू आहे. शाळा ऑनलाईन सुरू होऊन अर्धा महिना उलटला. मात्र शहादा तालुक्यातील अनेक गावांतील विद्यार्थी या ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नेटवर्कच्या शोधात आहेत; कारण शहादा तालुक्यातील लोंढरे, धांद्रे, कुकावल, कळंबू, बोराळे, मातकूट, खापरखेडा या गावांमध्ये मोबाईल नेटवर्क पुरेसे नसल्याने ऑनलाईन शिक्षणाच्या सोयी-सुविधा अजूनही पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत. तसेच तालुक्यातील अनेक गावांमधील मुलांकडे स्मार्टफोन नसल्याने त्यांच्या शिक्षणाचे काय होणार? हा प्रश्न पालकांसहित शासनाच्याही विचारात असावा.

राज्य सरकार आणि शिक्षण मंडळाने कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मागील वर्षाप्रमाणेच या वर्षीही ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गावांमध्ये नेटवर्क व ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधा आहेत, ती मुले सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाईन शिक्षणासाठी हजर आहेत. मात्र गरीब विद्यार्थी स्मार्टफोनअभावी तसेच अनेक गावांमध्ये पुरेशा नेटवर्कअभावी बरेच विद्यार्थी ऑनलाईनला मागील वर्षापासून सतत गैरहजर दिसत आहेत. म्हणून अशा विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्या तरी अंधारातच दिसत आहे. आताही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने अजूनही शाळा चालू होण्याची चिन्हे दिसत नसून, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईनला गैरहजेरीचे प्रमाण वाढतच राहणार आहे.

गेल्या वर्षी प्राथमिक शाळा उघडल्याच नाहीत; तर माध्यमिक शाळा दोन-अडीच महिने चालल्यावर पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढल्याने शासनाला पुन्हा या शाळा बंद कराव्या लागल्या. नंतर बोर्डाच्या परीक्षा इतिहासात प्रथमच शासनाला रद्द कराव्या लागल्या आणि सरसकट सगळ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या सगळ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण चालू आहे. मात्र तालुक्यात अनेक गावांमध्ये पुरेसे नेटवर्क तसेच अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने अनेक विद्यार्थी सलग दुसऱ्या वर्षाच्या शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने काहीतरी उपाययोजना करून अशा नेटवर्क नसलेल्या भागात तसेच स्मार्टफोन नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी, अशी प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

शाळेची इमारत न पाहताच विद्यार्थी दुसरीला

पालकांनी मागील वर्षी सहा वर्षे वय पूर्ण झाल्यावर आपल्या पाल्यांना पहिलीला प्रवेश मिळवून दिला होता. मात्र ॲडमिशन झाल्यावर सलग एक वर्ष शाळेची इमारत न पाहताच मुले दुसरीला गेली आहेत. आताही सहा वर्षे वय झालेल्या मुलांची नावे अंगणवाडीमधून पहिलीसाठी प्रवेशित झाली आहेत. असे विद्यार्थी ऑनलाईनमुळे या वर्षीही शाळा न पाहताच दुसरीला जातील, असे चित्र दिसत आहे.