शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृह बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण अधांतरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 12:34 IST

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  काही ठराविक जिल्ह्ये वगळता राज्यात सर्वत्र शाळा सुरू झाल्या असल्या तरी समाज ...

रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  काही ठराविक जिल्ह्ये वगळता राज्यात सर्वत्र शाळा सुरू झाल्या असल्या तरी समाज कल्याण विभाग व आदिवासी विकास विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या वस्तीगृहाची प्रवेश प्रक्रिया अद्याप रखडलीच असल्याने जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांचा यंदाचा शैक्षणिक भवितव्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष पूर्णता विस्कळीत झाले आहे. शिक्षण विभागाने सुरूवातीला ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग काढला. त्यानंतर कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला. त्यानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यात २३ नाेव्हेंबरपासून तर काही जिल्ह्यात डिसेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात सुरु झाल्या आहेत. मात्र शाळा सुरू करताना नियोजनाचा अभाव असल्याने त्याचे अनेक परिणाम प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर दिसू लागले आहे. सुरूवातीला शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यासाठी तीन दिवसाची मुदत देण्यात आली होती. मात्र स्वॅब घेतल्यानंतर अनेक शिक्षकांचे अहवाल तब्बल १२ ते १५ दिवसांनी आले. जे शिक्षक शाळेत जात होते पण त्यांचे स्वॅब पॉझिटीव्ह आल्याने शाळांची पंचायत झाली. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात अनेक शाळा सुरू करून आठ दिवसानंतर पुन्हा बंद कराव्या लागल्या. शाळा सुरू झाल्यानंतरही एस.टी. पासेस संदर्भात निर्णय नव्हता. म्हणून बाहेर गावाहून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. आता वस्तीगृहाबाबतचा प्रश्न मात्र अद्यापही ऐरणीवर आहे. नववी ते १२ वी पर्यंतचे जवळपास दीड लाख विद्यार्थी समाज कल्याण व आदिवासी विकास विभागाच्या वस्तीगृहात राहून शिक्षण घेतात. हे विद्यार्थी दुर्गम अतिदुर्गम भागात राहात असल्याने या विद्यार्थ्यांना रोज शाळेत येण्यासाठी अनेक अडचणी आहेत.     वस्तीगृहातील प्रवेश नक्की होणार की, नाही याबाबत त्यांना व पालकांना प्रश्न पडला आहे. वस्तीगृहातील जुन्या विद्यार्थ्यांना नवीन वर्षासाठी प्रवेशाची प्रक्रियादेखील राबविण्यात आलेली नाही. दुसरीकडे शाळा सुरू झाल्यामुळे ऑनलाईन वर्ग बंद झाले. म्हणून हे विद्यार्थी शिक्षणापासून पूर्ण मुकले आहेत. जवळपास निम्म्या जिल्ह्यात शाळा सुरू होवून महिना झाला. मात्र वस्तीगृहातील विद्यार्थी अद्याप शाळेपासून लांब आहेत. त्यातच १२ वीचे परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर १० वीची प्रक्रिया येत्या ५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे हे विद्यार्थी अभ्यासक्रम कसा पूर्ण करतील असा प्रश्न पालकांना पडला आहे.विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अनिश्चितता  वस्तीगृहातील प्रवेश निश्चित झाल्याशिवाय विद्यार्थ्याचा शाळेतील प्रवेश निश्चित होत नाही. त्यामुळे अद्यापही वस्तीगृहातील विद्यार्थी शाळेपासून लांब आहेत. जोपर्यंत वस्तीगृहातील यादी जाहीर होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्याला कुठलाही शालेय योजनेचा लाभही मिळणार नाही. सद्या स्कॉलरशिपचे अर्ज भरणे सुरू आहे. पण त्यासाठी रेक्टरचे पत्र आवश्यक असल्याने या विद्यार्थ्यांना ते फॉर्मही भरता येत    नाही.

‘‘वस्तीगृहातील प्रवेश प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी यासंदर्भात आपण विरोधी पक्ष नेत्यांना प्रत्यक्ष भेटून व मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यासंदर्भात ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू केली पण तांत्रिक अडचणींमुळे तेही ठप्प आहेत. अशीच गती राहिली तर पुढील तीन महिनेही प्रवेश प्रक्रिया होऊ शकत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षाला मुकावे लागेल.                      -राजेंद्रकुमार गावीत, संस्थाचालक, नंदुरबार.