शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसडक आणि आदिवासी योजनांवर जोरदार चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी विद्याथ्र्याचे वसतिगृह, आश्रमशाळा, ग्राम सडक योजना, नर्मदा काठावरील जलवाहतूक आणि तोरणमाळ पर्यटन विकासाची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी विद्याथ्र्याचे वसतिगृह, आश्रमशाळा, ग्राम सडक योजना, नर्मदा काठावरील जलवाहतूक आणि तोरणमाळ पर्यटन विकासाची योजना या विषयांवर जिल्हा नियोजन व विकास समितीत सलग तीन तास चर्चा चालली. इतिवृत्तांवरच वेळ गेल्याने बैठक स्थगित करून पुढील विषयांवर चर्चा करण्यासाठी पुन्हा 28 जुलै रोजी बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस आमदार सुरूपसिंग नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सुर्यवंशी, जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्ष आणि समिती सदस्य उपस्थित होते. रावल म्हणाले, आश्रमशाळेतील विद्याथ्र्यांना आंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्यावी. त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणी शुद्धिकरण संयत्र बसविण्यात यावे. चांगल्या दर्जाचे शैक्षणिक व इतर साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना शैक्षणिकदृष्टया सक्षम करण्यासाठी चांगली शिक्षण प्रणाली विकसीत करावी, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या विकासाविषयी चर्चा करताना ते म्हणाले, जिल्ह्याला शैक्षणिक, सामाजिकदृष्टया पुढे आणण्यासाठी विशेष प्रय}ांची आवश्यकता आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी योग्यरितीने होईल याकडे अधिका:यांनी लक्ष द्यावे. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार रस्त्यांच्या कामांची तपासणी वरिष्ठ अधिका:यामार्फत करण्यात यावी. रास्त धान्य दुकानदारामार्फत वितरीत होणारे धान्य ई-पॉस मशिनद्वारे देण्याच्यादृष्टीने लाभाथ्र्यांची नोंदणी करण्यासाठी विशेष अभियान हाती घेण्यात यावे. या अभियानात पात्र कुटुंबांना रेशनकार्ड आणि उज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनदेखील वितरीत करण्यात यावे. तोरणमाळ येथे पर्यटन विभागामार्फत मंजूर निधीतून कामे करण्यासाठी वन विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. भूषा येथून जलवाहतूक करणा:या बोटींची तपासणी करून आवश्यक सुरक्षा मानकांचे पालन होत नसल्यास बोटींना बंदी करावी. पावसाळ्यात जलवाहतूकीबाबत विशेष दक्षता घ्यावी. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामांच्या दजार्बाबत विशेष दक्षता घ्यावी. वैद्यकीय अधिकारी नियुक्तीच्या ठिकाणी राहतील याकडे लक्ष द्यावे, असेही रावल यांनी सांगितले. यावेळी डीबीटीद्वारे अनुदान, शहादा येथे पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, तोरणमाळ येथील विद्युत उपकेंद्र, दुर्गम भागात सोलरपंप बसविणे, आश्रमशाळेतील रिक्त पदे आदी विविध विषयांवरील चर्चेत लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला. आश्रमशाळेतील रिक्तपदे लवकर भरण्यात येणार आहेत. अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील 188 गावात मेडामार्फत सोलरपंप बसविण्यात येणार आहेत. तोरणमाळ येथील उपकेंद्रासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती अधिका:यांनी दिली. ठाणेपाडा येथे वनविभागाने मोरांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करून त्याठिकाणी पर्यटनस्थळ निर्माण करण्याबाबत आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

बैठकीची वेळ सकाळी 10 वाजेची असतांना 11 वाजता सुरू झाली. दोन वाजले तरी केवळ मागील बैठकीच्या इतिवृत्तावरच चर्चा सुरू राहिली. बैठकीच्या नियोजित वेळेर्पयत अजेंडय़ावरील इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाले. पालकमंत्री रावल यांचे पुर्वनियोजित इतर कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी बैठक 28 जुलै रोजी पुन्हा घेण्याचे सांगितले. त्यानुसार बैठकीचे उर्वरित कामकाज हे 28 जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचा:यांना पुन्हा नव्याने बैठकीसाठी तयारी करून यावे लागणार आहे. 

बैठकीनंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारण्यात येणा:या जिल्हा नियोजन समिती सभागृहाचे भूमीपुजन करण्यात आले. परिसराच्या सौंदर्यात भर घालणारी बहुउपयोगी इमारत उभी करावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.याुमळे आता नियोजन समितीला नवीन इमारत मिळणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात नियोजन भवनाच्या इमारती असतांना नंदुरबारात ही इमारत नव्हती. आता लवकरच ती आकाराला येवून त्या ठिकाणी कामकाज सुरू होणार   आहे.