शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाले व व्यावसायिकांची दर १५ दिवसांनी रॅपिड अँटिजन टेस्ट घ्यावी- जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

डॉ.भारुड म्हणाले, कोरोना बाधित आढळलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील आणि परिसरातील सर्व नागरिकांचे स्वॅब संकलन करण्यात यावे. प्रत्येक १५ दिवसांनी व्यावसायिक, ...

डॉ.भारुड म्हणाले, कोरोना बाधित आढळलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील आणि परिसरातील सर्व नागरिकांचे स्वॅब संकलन करण्यात यावे. प्रत्येक १५ दिवसांनी व्यावसायिक, फेरीवाले, भाजी आणि फळ विक्रेत्यांची अँटिजन चाचणी करण्यासाठी विशेष मोहिम घेण्यात यावी. संपर्क साखळीतील एकही व्यक्ती चाचणीपासून सुटणार नाही याची दक्षता घ्यावी. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालयातील तापाच्या रुग्णांचेदेखील स्वॅब घ्यावेत.

जिल्ह्यात लसींचा पुरेसा पुरवठा असल्याने दुसऱ्या डोससाठी पात्र व्यक्तींच्या लसीकरणासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. लसीकरण शिबिर आयोजित करताना लसींच्या उपलब्धतेसाठी जिल्हा यंत्रणेसाठी समन्वय ठेवावा आणि दुर्गम भागात अधिक शिबिरांचे आयोजन करावे. वॉर्डनिहाय आणि गावनिहाय याद्या तपासून कमी लसीकरण असलेल्या गावात विशेष मोहीम राबवावी. डीएम फेलोज, बचत गटांचे सदस्य यांचा उपयोग जनजागृतीसाठी करण्यात यावा.

रुग्णवाहिकांचा उपयोग अधिक गरज असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्राधान्याने करण्यात यावा. बाईक ॲम्ब्युलन्ससाठी चालकांना प्रशिक्षण देण्यात यावे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. मनरेगाच्या माध्यमातून अधिकाधिक कामे सुरू करण्यात यावी.

गावडे म्हणाले, कोरोना बाधितांची संख्या कमी होत असतानाही कोविड केअर सेंटरची यंत्रणा सज्ज ठेवावी. लसीकरणासाठी मनुष्यबळाचे योग्य नियोजन करण्यात यावे. सुटीच्या दिवसातही स्वॅब संकलन आणि लसीकरण मोहिमेची गती कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मनरेगा अंतर्गत घरकुलांची कामे वेगाने पूर्ण करावी.