शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात हद्दीजवळील कारेघाट जंगलातून ११ लाखांचा दारूचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:32 IST

नवापूर : गुजरात अवैध विक्रीसाठी नेण्यात येणारा ११ लाख रुपयांचा दारूसाठा नवापूर पोलिसांनी मंगळवारी दुपारी जप्त केला. कारेघाट जंगलाचा ...

नवापूर : गुजरात अवैध विक्रीसाठी नेण्यात येणारा ११ लाख रुपयांचा दारूसाठा नवापूर पोलिसांनी मंगळवारी दुपारी जप्त केला. कारेघाट जंगलाचा आधार घेत नवापूर ते लक्कडकोट मार्गाने ही दारू गुजरात राज्यात पोहोचवली जात होती. जिल्ह्यासह नवापूर तालुक्यात संचारबंदी काळात दारू, गुटखा वाहतुकीवर पोलिसांकडून कारवाई सुरू झाल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस सूत्रांनुसार, मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील कारेघाट जंगलातून गुजरात राज्यात एक लाल रंगाचा टेम्पो दारू घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने नवापूर पोलिसांचे पथक सतर्क झाले होते. यानुसार त्यांनी जंगलात गस्त सुरू केली असता, एम.एच ३९ ए बी ०८८३ हा टेम्पो दिसून आला. दरम्यान, चालकाला थांबण्याची सूचना करून तो न थांबल्याने पथकाने वाहनाचा पाठलाग करत कारेघाट गावाजवळील जंगलात हा टेम्पो ताब्यात घेतला. यात टेम्पोतून ११ लाख ७ हजार ४२० रुपयांची देशी-विदेशी दारू आणि बीअर मिळून आली. ११ लाख रुपयांचा मद्यसाठा आणि आठ लाखांचा टेम्पो असा एकूण १९ लाख ७ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा टेम्पो कारेघाट जंगलातून नवापूर पोलीस ठाण्यात आणून टेम्पोमधील दारू पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. ही कारवाई नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण, गुमानसिंग पाडवी, प्रवीण मोरे, आदींनी केली आहे. यासंदर्भात दोन संशयित आरोपींना नवापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, नवापूर शहरातून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात दारू तस्करी होत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.

हा मद्यसाठा नेमका कोणाचा, कोठून कोठे चालला होता याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांकडून दोघा संशयितांची कसून चाैकशी झाल्यानंतरच दारू वाहतुकीत गुंतलेल्या तस्करांची नावे समोर येणार आहेत.