वसतिगृहे सुरु करण्याबाबत अभाविपचे प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:37 IST2021-02-17T04:37:44+5:302021-02-17T04:37:44+5:30

पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग, महाविद्यालये तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये ...

Statement to the project officer of Abhavip regarding starting of hostels | वसतिगृहे सुरु करण्याबाबत अभाविपचे प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन

वसतिगृहे सुरु करण्याबाबत अभाविपचे प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन

पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग, महाविद्यालये तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु झाली आहेत पण वसतिगृह सुरु झाले नाहीत. त्यामुळे अन्य गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरात राहण्यासाठी व भोजनासाठी अमाप खर्च येत आहे. हा खर्च प्रत्येक विद्यार्थ्यांला परवडेलच असा नाही. महाविद्यालय सुरू झाल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. म्हणून शासनाने वसतिगृह तात्काळ सुरु करावीत, अशी मागणी अभाविपने केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास अभाविप येत्या काळात विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलन करेल, असा इशारा या वेळी देण्यात आला. अभाविपचे तळोदा शहरमंत्री प्रेम माळी, नंदुरबार जिल्हा संयोजक नीलेश हिरे, शुभम स्वामी आदींनी हे निवेदन दिले.

Web Title: Statement to the project officer of Abhavip regarding starting of hostels