शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीकडून दुरुस्तीच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST

महिलांकडून घरगुती कामांना पसंती नंदुरबार : लाॅकडाऊनमुळे सर्वच जण घरी आहेत. यातून महिलांकडून शेवया, पापड, कुरडया तयार करण्याच्या कामांना ...

महिलांकडून घरगुती कामांना पसंती

नंदुरबार : लाॅकडाऊनमुळे सर्वच जण घरी आहेत. यातून महिलांकडून शेवया, पापड, कुरडया तयार करण्याच्या कामांना वेग दिला जात असल्याचे दिसून आले आहे. विवाह सोहळे तसेच बाहेरगावी जाण्यास बंदी असल्याने महिला घरीच राहून एकत्र येत या कामांना पसंती देत असल्याचे दिसून आले आहे. अनेक महिला ह्या वस्तू तयार करून त्यांची विक्री करत आहेत.

केंद्रांवर शुकशुकाट

नंदुरबार : शहरात आरोग्य विभागाने लावलेल्या रॅपिड ॲंटिजेन टेस्ट कॅम्प सध्या सुने आहेत. जागोजागी नियुक्त कर्मचारी दुपारी १२ वाजेपर्यंत बसून राहत असल्याचे दिसून आले आहे. शहरातील अनेकांना किरकोळ आजार किंवा लक्षणेही नसल्याने चाचण्या घटल्याची माहिती देण्यात आली आहे. हे शिबिर सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

गस्तीत वाढ करावी

नंदुरबार : शहरातील जगतापवाडी भागात रात्रीच्यावेळी पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. या भागात रात्रीच्यावेळी चोरटे फिरत असल्याचे सांगण्यात आले आहे. परिसरात इतर वसाहतींमधील घरे ही लांबवर असल्याने त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी गस्तीची गरज आहे.

जलसाठा घटला

तळोदा : तालुक्यातील रोझवा, धनपूर व इतर लघु प्रकल्पांमधील जलसाठा घटत आहे. उन्हाळ्यामुळे पाणी आटत असल्याचे सांगण्यात येत आहे. यातून मासेमारीत अडचणी येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकल्पांवर काही जणांकडून शेती कसली जात आहे.

ग्रामीण जनतेकडून साहित्य जुळवाजुळव

नंदुरबार : जिल्ह्याच्या विविध भागात पावसाळ्यापूर्वी घर दुरुस्तीची कामे सुरू आहेत. यासाठी प्लॅस्टिक कागद, काैले, पन्हाळी पत्रे तसेच इतर साहित्याला मागणी असते. परंतु दुकाने बंद असल्याने त्याची खरेदी करणे जमत नसल्याने नागरिक या वस्तूंची जुळवाजुळव करत आहेत. सोमवार ते गुरुवार सुरू राहणाऱ्या बाजारात भेटी देत या वस्तूंचा शोध घेण्यावर भर दिला जात आहे.

आंबा उत्पादक चिंतेत

नंदुरबार : शहरातील बाजारपेठ दोन दिवस बंद असल्याने ग्रामीण भागातील आंबा उत्पादकांना फटका बसत आहे. यामुळे आंब्याची आवकच झालेली नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील महिला शेतशिवारातील बांधावरच्या गावराणी कैऱ्या तोडून त्यांना सेंद्रिय पद्धतीने तयार करुन आणतात.

लसीकरणाला गती

धडगाव : तालुक्यातील विविध भागात सध्या लसीकरणाच्या कामांना गती देण्यात आली आहे. यातून गाव पाड्यांवर शिबिरे घेत आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील गावांमध्ये विक्रमी शिबिरे झाल्याने धडगाव तालुक्यातही हे विक्रम होतील, अशी अपेक्षा असून त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे.

गतिरोधकांची गरज

नंदुरबार : शहरातील धुळे बायपास रोडवर करण चाैफुली ते होळ फाटा उड्डाणपूल या दरम्यान गतिरोधकांची गरज आहे. मार्गावर दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे. सोबत दोन्ही बाजूस रहिवासी वसाहती आहेत. यातून मार्गावर अपघात घडण्याची भीती असल्याने कारवाईची मागणी होत आहे.

दुपारी पळापळ

नंदुरबार : शहरातील विविध भागात रविवारी दुपारी कोणतेही काम नसताना फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई सुरू होती. यातून पोलीस पथक दिसल्यानंतर लांबूनच वाहने वळवून अनेक जण पळापळी करत असल्याचे दिसून आले. गांधी पुतळा व हाट दरवाजा भागात ही कारवाई सुरू होती.