नवापूर तालुक्यात सोयाबीन बियाण्याची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST2021-07-01T04:22:09+5:302021-07-01T04:22:09+5:30

हळदाणीसह परिसरात मृगाच्या धारा बरसल्यानंतर, शेतशिवारात शेतीकामांना गती देण्यात आली आहे. ट्रॅक्टर व बैलांच्या साहाय्याने पेरणी करण्यात आहे. या ...

Soybean seed scarcity in Navapur taluka | नवापूर तालुक्यात सोयाबीन बियाण्याची टंचाई

नवापूर तालुक्यात सोयाबीन बियाण्याची टंचाई

हळदाणीसह परिसरात मृगाच्या धारा बरसल्यानंतर, शेतशिवारात शेतीकामांना गती देण्यात आली आहे. ट्रॅक्टर व बैलांच्या साहाय्याने पेरणी करण्यात आहे. या भागात खरीप पिकांसोबतच कापूस, मका या पिकांची लागवड शेतकरी करत आहेत. या भागात काही शेतकरी उशिराने शेतीकामांकडे वळले आहेत. त्यांच्याकडून शेत मशागतीची कामे सुरू करण्यात आली आहेत. यात वखरणी व नांगरणीचा समावेश आहे. दरम्यान, या भागात सोयाबीनची पेरणीला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. यातून संकरीत वाणांना पसंती आहे. या वाणांच्या बियाण्यांची मागणी करण्यासाठी शेतकरी कृषिसेवा केंद्रांना भेटी देत आहेत, परंतु त्यांना बियाणे मिळत नसल्याची माहिती देण्यात आली आहे. यातून शेतकऱ्यांच्या वाढीव पेरणीच्या उद्दिष्टाला धक्का बसत आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Soybean seed scarcity in Navapur taluka