शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेडा शिवारात पपईच्या झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा शिवारात अज्ञात माथेफिरुने पपईची २० ते २५ झाडांची कत्तल केल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा शिवारात अज्ञात माथेफिरुने पपईची २० ते २५ झाडांची कत्तल केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शेतकरी संतप्त झाले असून पोलिसांनी अशा माथेफिरुंचा तपास करून कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.सारंगखेडा शिवारातील जगदीश शांतीलाल पाटील यांच्या शेतात चार एकर क्षेत्रावर पपईची लागवड केली आहे. या पपईच्या शेतात अज्ञात माथेफिरुने सुडबुद्धीने फळे असलेल्या २० ते २५ झाडांची कत्तल करून शेतकऱ्याचे नुकसान केल्याची घटना घडली. याबाबत या शेतकऱ्याने सारंगखेडा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून त्यावरून सारंगखेडा पोलीस तपास करीत आहेत. गेल्यावर्षीही या शेतकऱ्याच्या शेतात चार ते पाच महिन्यांची वाढ झालेल्या २० ते २५ पपईच्या झाडांची कत्तल केली होती. आता मात्र फळे पक्व झालेल्या झाडांची कत्तल करून नुकसान करण्यात आले आहे. आधीच पपई पिकाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात अज्ञात माथेफिरुंकडून अशाप्रकारे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतीत झाले असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याप्रकरणी सारंगखेडा पोलीस स्टेशनला अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक ठाणसिंग राजपूत हे करीत आहेत.दरम्यान, शेतपिकांचे नुकसान करणाऱ्या अज्ञात माथेफिरुंचा पोलिसांनी शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.