लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील गिरीविहार भागातील किराणा दुकान फोडून 1 लाख 10 हजार रुपये रोख लांबवल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली़ घटनेमुळे एकच खळबळ उडाली आह़े गिरीविहार परिसरातील रेखचंद अग्रवाल यांच्या दुकानाच्या वरील मजल्यावरील शटर वाकवून चोरटय़ाने दुकानात प्रवेश केला होता़ यानंतर दुकानात प्रवेश करणा:या चोरटय़ांनी ड्रॉवरमध्ये ठेवलेले 1 लाख 10 हजार रुपये चोरुन नेल़े सकाळी दुकानमालक अग्रवाल यांना हा प्रकार लक्षात आला़ घटनास्थळी श्वानपथक बोलावून चोरटय़ांचा माग काढण्यात आला़ याप्रकरणी रेखचंद नानुलाल अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील करत आहेत़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}