अक्कलकुव्यात दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 12:44 IST2020-04-13T12:43:57+5:302020-04-13T12:44:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातील फेमस चौकात किराणा दुकानाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले़ रविवारी दुपारी १ ...

Shop fire in Akkalkuwa | अक्कलकुव्यात दुकानाला आग

अक्कलकुव्यात दुकानाला आग

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : शहरातील फेमस चौकात किराणा दुकानाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले़ रविवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली़ आग विझवण्यात नागरिकांना यश आले असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही़ उशिरापर्यंत पोलीसांकडून पंचनामा सुरु होता़ नुकसानीच्या आकड्यांची जुळवाजुळव सुरु होती़
फेमस चौकातील फेमस किराणा दुकानाला दुपारी एक वाजेच्या सुमारास आग लागल्याचे नागरिकांना दिसून आले़ शॉर्टसर्किटमुळे ही लागल्याचे सांगण्यात आले़ दरम्यान तातडीने तळोदा येथील अग्निशामन बंबाला माहिती देण्यात आली़ बंद अर्ध्या तासात येथे पोहोचल्यानंतर नागरिकांसह बंबाने तासाभरात आग आटोक्यात आणली़ आगीत किराणा दुकानातील लाखो रुपयांच्या किराणामाल जळून खाक झाला़ घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, प्रभारी तहसीलदार विजय कच्छवे, पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी़डी़पाटील, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर दाखल झाले होते़ आग विझवण्यासाठी तसेच आगीच्या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने या परिसरात मोठी गर्दी जमली होती़ पोलीस हजर झाल्यानंतर अनेकांनी घराची वाट धरली़

संचारबंदी काळात आग लागल्यानंतर शेकडोंच्या संख्येने जमाव या ठिकाणी हजर झाला होता़ यातून संचारबंदीचे उल्लंघन झाल्याची चर्चा होती़ या नागरिकांवर येत्या काळात कारवाई होते किंवा कसे याकडे लक्ष लागून राहणार आहे़ दरम्यान शहरात शनिवारी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी भेट देत जामिया संकुलातील विद्यार्थ्यांची भेट घेतली होत़ी़ त्यांनी संपूर्ण पडताळणी करुन संस्थेकडून माहिती दिल्यानंतर पोलीस अधिक्षक पंडीत यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला़

Web Title: Shop fire in Akkalkuwa